प्रेमप्रकरणातून तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : नाशिकमधील समाजकल्याण विभागातील मुलींच्या वसतिगृहात एका मुलीने आत्महत्या केली आहे. गौरी जाधव (२१) असे मृत  मुलीचे नाव आहे.  गौरी शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. गौरी मूळची औरंगाबादची असून नर्सिंगच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती.

शहरात असलेल्या नाशिक – पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ समाजकल्याण विभागाचे विभागीय कार्यालया जवळ असलेल्या मुलींच्या  वसतीगृहात गौरी जाधव राहत होती. नाशिक शहरातील गणपतराव आडके नर्सिंग महाविद्यालयात द्वितीय वर्गात शिक्षण घेत होती.पोलीसांनी वसतीगृहात पोहोचल्यानंतर गौरीने आत्महत्या केलेल्या खोलीची तपासणी केली. यावेळी  आत्महत्येपुर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी तो जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.