मुक्त विद्यापीठातर्फे २३ पासून रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे येत्या २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण युवकांसाठी १५ दिवसांचा रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर निवासी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक ग्रामीण युवकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ग्रामीण युवकांसाठी विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात. त्याअंतर्गत सदर रोपवाटिका व्यवस्थापन (Horticulture Nursery Management) प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यात फळे, भाजीपाला व शोभीवंत फुलझाडांची रोपे, कलमे, त्यांची निगा – देखभाल व विक्री व्यवस्था याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येईल. सदर प्रशिक्षण २० जणांना देण्यात येईल. त्यासाठी प्रथम येणाऱ्या व्यक्तींची उद्योग व्यवसायाबाबत उपयुक्तता बघून निवड करण्यात येईल. प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीस प्रमाणपत्र व आवश्यक माहितीपुस्तिका केंद्राकडून देण्यात येईल. इच्छुक युवकांनी सदर कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विशेषज्ञ हेमराज राजपूत (९४२२७७३६०२) यांच्याशी २२ ऑगस्टपर्यंत आपले नाव, पत्ता, वय, शिक्षण यासह लघुसंदेश पाठवून संपर्क साधावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाच्या शेवटी करण्यात आले आहे.

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.