ylliX - Online Advertising Network

सटाण्याच्या कोठावदेंना पंतप्रधानांच्या हस्ते न्यु इंडिया कॉनक्लेव्ह पुरस्कार

सटाणा – आजवर प्रकाशात न आलेल्या ग्रामीण भागातील नायकांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी Y4D ने ‘न्यू इंडिया कॉन्क्लेव्ह’ स्पर्धत सटाणा येथील साई सावली एजन्सीजचे संचालक युवा उद्योजक प्रशांत कोठावदे यांना ग्रामीण उद्योजक पुरस्कार 16 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवन, दिल्ली येथे वितरित करण्यात आला. Y4D New India Conclave Narendra Modi felicited Prashant Kothawade Satana

वाय फॉर डी फाउंडेशन, दालमिया सिमेंट आणि अवनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वितरित या पुरस्काराचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. ५०% जनता २५ वर्षाच्या आतील असून त्यातील बहुसंख्य लोक ग्रामीण भागात राहतात. हे तरुण कुशल, प्रगतीशील व उत्साही असून समाजाला आणि देशाला बदलून टाकण्याची त्यांची क्षमता आहे. सामाजिक, व्यावसायिक, राजकीय आणि इतर क्षेत्रात नेतृत्व स्वीकारून बदल घडविण्यासाठी तरुण पिढी सज्ज आहे. त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांची योग्य दखल घेणे व प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन मतदानात सर्वाधिक मते मिळाल्याने कोठावदे यांना विजेता घोषित करून पुरस्कार वितरण करण्यात आले.

न्यु इंडिया काँनक्लेव यांच्या वतीने माझ्या कार्याची दखल घेत मला ग्रामीण युवा उद्योजक पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे माझ्या येथून पूढे माझे कार्य असेच चालु राहील ग्रामीण भागातील युवकांचे व युवा शेतकरी मित्रांचे अडीअडचणी सोडवण्यास नक्कीच प्रयत्न करेल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पुरस्कार मिळाल्यानंतर अजून ऊर्जा मिळाली असुन माझे कार्य या पुढे ही असेच चालू राहील मला ऑनलाईन मतदान करणाऱ्या सर्वाचे मनापासुन आभार..
— प्रशांत कोठावदे

कोण आहेत प्रशांत कोठावदे?

प्रशांत कोठावदे हे सटाणा शहराचे रहिवासी असून 2007 पासून पुढील तीन वर्षे शहरातील शाहू ट्रॅक्टर येथे नोकरी करत असताना स्वतःचा व्यवसाय असावा असे कायम मनात असे. अखेर 2010 मध्ये साई एजन्सीज नावाने शेती करण्यासाठी आवश्यक उपकरणे विक्री करणारी एक छोट्याश्या फर्मच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद आणि संपर्क वाढविण्याची कोठावदे यांची सुरुवात झाली. Y4D New India Conclave Narendra Modi felicited Prashant Kothawade Satana

यामध्यातून पुढे ट्रॅक्टरला जोडून कृषी उपयोगी साधनांची विक्री सुरू करून त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती देऊन त्याचे प्रशिक्षण देण्याचे काम कोठावदे यांनी केले. संपूर्ण बागलाण आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी बांधवांनी साथ देत उत्तम प्रतिसाद यास मिळू लागला. कृषी इक्विपमेंट्स सह प्रशांत यांनी कोल्ड्रिंक्सचा व्यवसाय सुरू करत स्पॉट डिलिव्हरी केल्याने त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

लहानपणापासूनच समाजसेवेची रुची असताना 2014 साली साई सावली फाउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवणे रक्तदान शिबिरांचे आयोजन, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सन्मान आदी कामे प्रशांत कोठावदे करीत आहेत.

Y4D New India Conclave Narendra Modi felicited Prashant Kothawade Satana
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.