महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं ईगतपुरीतल्या आपल्या प्रकल्पात जगातला सर्वात उंच प्लॅस्टिक बॉटल मॉन्स्टर अर्थात प्लास्टिक प्रदूषणाचे राक्षस उभा केल आहे.‘पर्यावरण’ वाचवा हा राक्षस असून तो संदेश देण्यासाठी 21 मीटर उंचीचा केला आहे. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.भारत स्वच्छता अभियान अंतर्गत महिंद्राच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी नाशिक आणि परिसरात स्वच्छता मोहिम राबवली होती. त्यावेळी महिंद्राच्या दीड हजार कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाला हानिकारक असलेल्या 1 लाख 300 प्लॅस्टीक बॉटल्स गोळा केल्या आहेत. तर यातून संदेश देण्याकरीता हा प्रकल्प उभा केला आहे. प्लॅस्टिक कचरा पर्यावरणासाठी किती घातक आहे याचा संदेश नागरिकांना देण्यासाठी महिंद्रानं मॉन्स्टर बनवण्याचा निर्णय घेतला. तर जगाता प्लास्टिक बॉटल्सचा असलेला मॉन्स्टर असून तो जगातला सर्वात उंच मॉन्स्टर आहे. मात्र, आता महिंद्राच्या या मॉन्स्टरची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. प्लास्टिक बॉटल्सवर बंदी टाकून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याबरोबरच कृतीही महिंद्रानं केली असल्याची माहिती महिंद्रा तर्फे यावेळी देण्यात आली आहे.