अपार्टमेंटच्या पाण्याच्या टाकीत महिलेचा मृतदेह

गोविंदनगर परिसरात पाण्याच्या टाकीमध्ये   महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा प्रकार गोविंदनगर येथे घडला असून यामध्ये उषा नाना पाटील (43, रा. 21 को-ऑप. हौसिंग सोसायटी, गोविंदनगर यांचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुंबई नाका पोलिस स्टेशनला नाना पाटील यांनी त्यांची पत्नी उषा पाटील या बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. सोसायटीच्या गच्चीवर एक इसम गेला होता तेव्हा त्याला या परिसारत दुर्गंधीयुक्त  वास येत होता. त्याने त्यावेळी टाकीत पाहिले असता त्याला तेथे महिला बुडाल्या स्थितीत आढळून आल्या होता. ही बातमी लगेच पोलिसांना कळविली असता पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला, यामध्ये मृत महिला याच  उषा पाटील असल्याची खात्री पटली.

सायटीच्या या पाण्याच्या टाकीतील पाणी फक्त वापरण्यासाठीच वापरले जात होते. आज दूर्गंधी येऊ लागल्याने बेपत्ता झालेल्या पाटील यांची  उकल झाली आहे.  उषा पाटील या दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीत डोकावून पाहण्यासाठी गेल्या असतानाच त्या पडल्या असाव्यात आणि त्यातच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला असा प्राथमिक  अंदाज पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.कोणताही घातपात असावा ही शक्यता नाकारली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.