नाशिक : लॉटरीचे आमिष दाखवत लाखो रुपये घेवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानातील संशयित इसमाने हा सर्व प्रकार केला असून पोलिसांनी यास दुजोरा दिला आहे. सायबर पोलिस याविषयी तपास करत असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या प्रकरणी देवळाली कॅम्प परिसरातील महिलेस 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून, ती रक्कम मिळविण्यासाठी तिला 27 लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. मागील पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू होता, फसवणूक झल्याने सदरील महिलेचे मानसिक स्थितीही ढासळली आहे.सविस्तर वृत्त असे की, महिला मोना फारूख इराणी (वय ५४, भगवानसिंग बंगला, संसरी नाका, लॅमरोड, देवळाली कॅम्प) येथे रहिवासी असून त्यांची फसवणूक झाली आहे.इराणी या पतीसह बंगल्यास राहतात असून दोन मुली परदेशात आहेत.woman betrayal lottery bait pakistani fooled looted 25 lakhs nashik
शहरातील शालिमार चौक येथे त्यांचे हॉटेल आहे. त्या पैश्यातून घरातील खर्च भागवले जातात. मोना इराणी यांना 8 एप्रिल 2013 मध्ये रोजी त्यांच्या मोबाईलवर 092 या क्रमांकाने सुरू होणाऱ्या मोबाईलवरून फोन आला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत संशयित इसमाने इराणी यांना 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले, मात्र इराणी यांनी नकार देत प्रतिसाद दिला नाही. मात्र परत संशयित इसमाने पुन्हा पुन्हा फोन करत तुम्हाला खरच लॉटरी लागल्याचे सांगत त्यांना पटवून देत. या लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठी काही रक्कम सायनिंग अमांऊट जर बँकेच्या खात्यावर भरली तर लॉटरीची रक्कम तात्काळ मिळणार आहे. हे पटवून दिले आणि विश्वास संपादन केला होता.मात्र या विश्वासावर आणि आमिषाला बळी पडत इराणी यांनी एप्रिल 2013 ते ऑगस्ट 2018 या पाच वर्षात संशयित व्यक्तीने निर्देशित केल्या प्रमाणे सुरवातीला 10 हजार रु. तर पुढे दोन , तीन लाख अश्या रक्कम त्याच्या बॅंक खात्यावर जमा केली.woman betrayal lottery bait pakistani fooled looted 25 lakhs nashik
यात इराणी यांच्या कडे हाताशी पैसे नसताना त्यांनी घरातील दागदागिने विकले, गरज आहे असे सांगत नातेवाईक, मुलींकडून उसनवार पैसे घेतले होते. बॅंक खात्यावर जमा पैसे हिशोब केला तर आत्तापर्यंत 26 लाख 95 हजार 169 रुपये जमा केले असून बँकेत पैसे भरल्याच्या त्यांच्याकडे 86 पावत्या आहेत. ही सर्व व्यवहार सुरु होता तेव्हा इराणी यांनी घरातील कोणालाही आणि मुलीनां याबाबत काहीच सागितले नाही. मात्र सतत इतके पैसे भरून सुद्धा कोणतीच रक्कम मिळत नसल्याने चिंतीत झालेल्या मोना इराणी यांनी संशयितांकडे विचारणा केली. मात्र त्याने कोणतेही ठोस उत्तर तर दिलेच नाही उलट रक्कम देण्यास नकार दिला आहे.नाशिक सायबर पोलिस ठाण्यात त्यांनी शेवटी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र कर्ज आणि अश्या प्रकारे फसवणूक झाली त्यामुळे मोना इराणी यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.woman betrayal lottery bait pakistani fooled looted 25 lakhs nashik
नाशिकच्या बातम्या हव्या मग Whats App लिक असून ज्वाइन करा, ग्रुपमध्ये पोलीस अधिकारी, राजकीय व्यक्ती आहेत. कृपया बातमी सोडून काही टाकू नका नाहीतर रिमूव केले जाईल :
https://chat.whatsapp.com/8Y4rF0ioa954F7uoqTrh3H
आमचे फेसबुक पेज लाईक करा :
https://www.facebook.com/NashikOnWeb/
फोन पाकिस्तानातूनच आला :
या प्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी यावर तपास सुरु केला आहे. यामध्ये प्रथमिक माहिती आणि पुरावे पाहत सोबतच क्रमांक कोड अर्थात दूरध्वनी जागतिक कोड नुसार +०९२ तो पाकिस्तान येथील आहे हे उघद झाले असून पोलिसांनी दुजोरा दिला आहे.सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील संशयिताच्या बॅंकखात्याची माहिती संकलित करत तपास करत केली जात आहे. ( बातमीचा फोटो हा प्रातिनिधिक स्वरूपातील आहे, विषयानुरप आहे म्हणून वापरला आहे वाचकांनी नोंद घ्यावी.)
oman betrayal lottery bait pakistani fooled looted 25 lakhs nashik