ylliX - Online Advertising Network

आदिवासी पाड्यावर चिमुकल्यांसाठी भेटवस्तू घेऊन गेला वोक्हार्ट हॉस्पिटलचा सांता

वोक्हार्ट हॉस्पिटलचा आदिवासींच्या पाड्यावर समाजसेवा

नाशिक-आरोग्य सेवेप्रमाणेच समाजसेवेतही सदैव अग्रेसर असणाऱ्या वोक्हार्ट हॉस्पिटलने परत एकदा समाजापुढे नवीन आदर्श मांडला आहे. सर्वत्र ख्रिसमसचे पर्व साजरे होत असतांना, वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक येथील कर्मचाऱ्यांच्या चमूने खाडा तालुक्यातील चीकणपाडा या अगदी लहान आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील स्थानिक आणि लहान मुलांसोबत हे सण साजरे केले. सर्व कर्मचाऱ्यांकडून कपडे, खेळणी इत्यादी अश्या अनेक वस्तू गोळा करून येथील चिमुकल्यांना भेट करण्यात आल्या. लहान मुलांना वाह्या व पेन याचे वाटप करण्यात आले आणि त्यांना खाद्य पदार्थ सुद्धा देण्यात आले. सांताला बघून चिमुकल्यांमधे आनंदाचे वातावरण होते आणि वयोवृद्धांनी सांता पहिल्यांदा बघन्यात आले अशी भावना व्यक्त केली.

या प्रसंगी बोलतांना वोक्हार्ट हॉस्पिटलचे मानव संसाधन प्रमुख देवेंद्र गायधनी म्हणाले या पाड्यावरील लोकांचे आजीवीकेचे साधन शेती, पशुपालन आणि मजुरी इतकेच आहे. पाड्यावरील लोकांपुढे स्वच्छ पाणी, पोषण आहार, उत्पन्न आणि आरोग्य या सर्वव्यापी समस्या आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी दिगंत स्वराज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था अविरतपणे जव्हार-मोखाड्यामध्ये काम करीत आहे आहे, या संस्थेच्या संचालिका श्रीमती श्रद्धा श्रृंगारपुरे यांची सुद्धा या उपक्रमाला मोलाची साथ लाभली.

नाशिक हॉस्पिटल
हॉस्पिटल

प्रत्येक वर्षी हा उपक्रम हा एका अनाथाश्रमात राबवला जातो, आम्ही या वर्षी काही नवीन करण्याचे ठरवले होते. या संकल्पनेतून या पाड्यावर येऊन “बी अ सांता” हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. याच प्रमाणे वोक्हार्ट हॉस्पिटलने आधी बाल सुधार आश्रमात सॅनीटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवीले आणी वात्सल्य वृद्धाश्रमाला स्वास्थ्य संबंधी उपकरणे सुद्धा भेट दिले. असेच बरेच उपक्रम येत्या काळात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने राबवले जातील असे उद्गार विपणन प्रमुख श्री. अभिषेक शर्मा यांनी या प्रसंगी काढले.

तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय आहात, फेसबुकवर देखील आहात मग आमचे पेज नक्की लाईक करा, आमच्या पेजवर नाशिक सोबत उत्तर महाराष्ट्र आणि राज्यातील प्रमुख बातम्या आपल्याला वाचायला मिळतील त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला खरी बातमी मिळणार आहे. फेक न्यूज , फॉर्वड केलेली माहिती तपासून पहा , अफवा पसरवणे अपराध आहे. एक चूक कोणाचाही जीव घेवू शकते..

आमचे फेसबुक पेज लिंक :

https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.