RK Nashik ‘मनपा कुणाच्या परवानगीने आर.के वरील ट्रायल रन घेतला’ – पोलीस आयुक्त ; झाला हा निर्णय

ट्रायल रन’ प्रश्नी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना झापले
स्मार्ट सिटीने ट्रायल रन सुरू केल्याने परिसरात वाहतूक कोंडीत भर पडत असून नागरिक व व्यावसायिक हैराण झाले.स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आलेल्या ट्रायल रनबाबत स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचा पोलिस आयुक्तांनी घेतली माहिती ‘कुणाच्या परवानगीने हा ट्रायल रन घेतला’ असा जाब विचारत पोलिस प्रशासनाच्या अधिसूचने शिवाय ट्रायल रन न घेण्याच्या सूचना दिल्या. यामुळे तूर्तास ट्रायल रनला ब्रेक लागणार आहे. RK Nashik
रविवार कारंजा, भडक दरवाजा (दिंडोरी) नाका, शालिमार चौकात ट्रायल रन घेण्यात आला होता. या रनमुळे वाहतूक कोंडी झाली होती.याची पोलिस आयुक्त दीपक पांड्ये यांनी गंभीर दखल घेत स्मार्ट अधिकाऱ्यांना जाब विचारला. ट्रायल रनबाबत पोलिस परवानगी न घेतल्याने स्मार्ट अधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत माफी मागीतल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
रविवार कारंजा नाशिक
रविवार कारंजा नाशिक

नाशिक महापालिका स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेड अर्थात स्मार्ट सिटी कंपनीकडून गावठाण विकास योजनेतून चौकांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवार कारंजा परिसरात जंक्शन साकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करण्यासाठी वाहतुकीचा ट्रायल रन घेतला जात आहे. यासाठी सकाळी याठिकाणी गोण्या टाकण्यात आल्या. मात्र, अगोरदच हा मार्ग अरूंद असल्याने या जंक्शनसाठी टाकलेल्या गोण्यांमुळे वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एमजीरोड मेहेर सिग्नल पुढे अशोक स्तंभ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. RK Nashik

स्थानिकांचा विरोध

यापूर्वी दहीपूल परिरात स्मार्ट सिटीअंतर्गत संपूर्ण रस्ता खादून ठेवल्याने येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. आता महात्मा गांधी रोड परिसरात विरुद्ध दिशेला स्मार्ट सिटीचे उर्वरित कामे सुरु आहे. त्यामुळे दुकानाजवळची पार्किंग रस्त्यावर आली आहे. दोन्ही दिशेने चारचाकी वाहने आली तर संपूर्ण रस्ता तिथेच थांबतो. यापूर्वी अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मार्गाच्या कामामुळे नागरिकांना अक्षरशः रस्त्यावर उतरावे लागले. आता रविवार कारंजा परिसरात ट्रायल रन सुरू आहे. मूळात रविवार कारंजा हा वर्दळीचा परिसर आहे. तसेच येथे दुकाने, शाळा, रिक्षा स्टॅन्ड, बस स्टॉप असल्याने येथे मोठी गर्दी असते, त्यामुळे येथे वाहन पार्किंगचा प्रश्न असताना जंक्शन उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.