व्हॉट्सअॅप हॅकिंग प्रकरण : राजस्थानहुन दिप्तेश सालेचा या संशयित आरोपीला अटक

व्हॉट्सअॅप हॅकिंग प्रकरण.. राजस्थानहुन आरोपीला अटक. नाशिक पोलिसांची उत्तम  कामगिरी

बी. कॉमचा विद्यार्थी युट्युब व्हिडीओज बघत शिकला हॅकिंग… अश्लील चॅट करण्याच्या विकृतीतून हॅकिंग

नाशिक शहरातील प्रसिद्ध डॉक्‍टर, मॉडेलिंग क्षेत्रातील व्यक्तींसह उद्योजकांचे व्हॉट्‌सॲप अकाउंट हॅक केल्याप्रकरणी नाशिकच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ३० तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या प्रकरणी  संशयित  दिप्तेश  सालेचाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिप्तेशने डॉक्टर,उद्योजक महिलांचे व्हाट्स अप हॅक करून अश्लील मेसेज पाठवत होता.पुणे, मुबई,नाशिक मधील महिलेनंचे मोबाइल हॅक केल्याच तपासात आलं समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ३० तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 7 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सायबर पोलिसांनी अनोळखी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या बुधवारी डॉ. मनीषा रौंदळ यांचे व्हॉट्‌सॲप हॅक झाले होते. हॅकर त्यांच्या नावाने अश्‍लील संदेश, व्हिडिओ क्‍लिप्स पाठवून त्रास देत होता. डॉ. रौंदळ यांनी आपला मोबाईल व्हॉट्‌सॲप बंद करून ठेवला होता, तरी हॅकरचे उद्योग सुरू होते.

डॉ. सारिका देवरे यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. हॅकरने महिलांचे व्हॉट्‌सॲप अकाउंट टार्गेट केले होते. हॅकरच्या उपद्रवामुळे शहरातील डॉक्‍टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थी हैराण झाले होते. हे सर्व करणारा दिप्तेश हा  एक हॅकर आहे. या प्रकरणात सर्वाधिक एंड्रॉयड मोबाईल त्याने हॅक केले होते. यामध्ये विशेष असे की  शिकलेले आणि प्रतिष्ठीत अश्या महिला यामध्ये अडकल्या होत्या. पोलिसांनी अनेकदा जनजागृती करून सुद्धा असे प्रकार घडत आहेत.

शहरवासीयांचे त्यातही बहुसंख्य महिलांचे केवळ व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटच नव्हे तर फेसबूक आणि इन्स्टाग्रामचे अकाउंटही हॅक करण्यात आल्याच्या तक्रारी पोलीसांकडे नोंदवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, दिप्तेशकुमार बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत असून तो युट्युब व्हिडीओज बघून हॅकिंग शिकला. आधी त्याने त्यांच्या मित्रांना या जाळ्यात ओढले. आणि नको ते चॅटिंग करण्यासाठीचे विकृती असलेल्या काही मुलांना हाती धरत महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

केवळ पंधरा दिवसात त्याने हा उद्योग एवढा सराईत पाने करण्यास शिकला की पोलिसांपासून वाचण्यासाठी तो सतत आपले ठिकाण बदलत होता. या हॅकरच्या मागावर शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर शाखेची २ पथके रवाना करण्यात आली होती.

काय होते प्रकरण :

व्हॉट्सअॅप झाले अनेकांचे हॅक नाशिकमध्ये अनेकांना मनस्ताप अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण

नाशिक : कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये आतातर एक नवीन प्रकार पुढे आला आहे. व्हॉट्सअॅप नंबरचे अकाऊंट काही सायबर क्रिमिनल हॅक करत आहेत. तर त्या अकाऊंट वरून नंबरसोबत निगडीत सर्व इतर नंबरअसलेल्या इतरांना अश्लिल मेसेज, क्लिप, संशयास्पद संभाषण, शिवीगाळ पाठवली जात आहे. त्याचा मोठा फटका नाशिक येतील ४० पेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. या सर्वांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंट कोणी हॅक केल्याचे आपण नेहमी ऐकतो, किंबहुना अनेकांना त्याचा अनुभव सुद्धा आला असेल.तसाच प्रकार व्हॉट्सअॅप सोबत सुरु झाला आहे. यामध्ये आपल्या जवळील व्यक्ती घाण मेसेज, अश्लिल चित्रफित,फोटो आणि नाही नाही ते प्रकार पाठवत आहेत. त्यामुळे अनेक महिला हैराण झाल्या आहेत.

यामध्ये नाशिक मधील डॉक्टर सारीका देवरे यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक  झाले आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप आणि सामाजिक बदनामी सहन करावी लागत आहे. यामध्ये  मित्र , सहकारी, नातेवाईकांना अश्लिल मेसेज, व्हिडीओ क्लिप पाठवल्या जात आहे.वैतागून त्यांनी त्यांचे अकाऊंट बंद केले. मोबाईल बंद केला मात्र त्रास काही कमी होताना दिसला नाही त्यामुळे त्यांनी नाशिक सायबर क्राईम पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या सारखे असे ४० पेक्षा अधिक लोकांना याचा फटका बसला आहे.

नाशिक शहरातले अनेक नामवंत डॉक्टर, मॉडेल, खेळाडू, उद्योजक, विद्यार्थी नेटीझन्स या हॅकर्सच्या उपद्रवांनी हैराण झाले आहेत. डॉ. गौरी पिंप्रोळकर आणि नीलेश सुदाम दाते यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.अज्ञात व्यक्ती एक व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केल्यावर सदर व्यक्तीच्या अकाऊंटमधील इतर ओळखीच्या व्यक्तीस व्हॉट्सअॅप करून ओटीपी जनरेट करून या ओटीपीची मागणी करते. हा ओटीपी प्राप्त होताच संबंधित अकाउंटसुध्दा हॅक होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सायबर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात हॅकर्सच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॅक झाल्यास काय कराल?

तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करा आणि रिइन्स्टॉल करा. पुन्हा तुमचा नंबर वापरुन व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर रजिस्ट्रेशन करा.तुमचा सिक्युरिटी व्हेरिफिकेशन कोड कधीच कोणासोबत शेअर करु नका, तर व्हॉट्सअॅप मध्ये टू वे सेक्युरेटी नावाचा प्रकार आहे,त्यामध्ये जर रजिस्टर केले तर ते चोरट्यांना हॅक करणे अवघड होते हॅक करता येत नाही. सर्वात महत्वाचे आपल्या मोबाईलव येणारा व्हेरिफिकेशन कोड हा स्वतः साठीच असतो कोणतही बँक संस्था,सरकारी अधिकारी, अगदी कोणीही तो तुमच्या कडे मागू शकत नाही त्यामुळे तो कोड कोणालाही देवू नकाच.आपल्या घरातील महिला, मुली यांचे सेटिंग सेक्युर करून घ्या.त्यांना विश्वासात घेवून हे सर्व सांगा त्यामुळे त्यांना असा मनस्ताप बोगावा लागणार नाही.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.