ylliX - Online Advertising Network

Whatis bird flu पहिला प्रश्न, बर्ड फ्लू आहे तरी काय?चिकन आणि अंडी खाणं

सगळ्या पहिला प्रश्न, बर्ड फ्लू आहे तरी काय?

बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा (avian influenza) असंही म्हणतात. जो पक्षांच्या लाळेवाटे, विष्ठेवाटे किंवा त्यांच्या डोळ्यांवाटे इतर पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांनी पंख जरी झटकले, तरी हा विषाणू इतरत्र पसरु शकतो. ज्या पक्षांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, ते पक्षी यामुळे दगावतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते.(Whatis bird flu? What are its symptoms? All information about bird flu)

बर्ड फ्लूच्या नावातील ‘H’,’N’चा अर्थ काय?

पक्षांमध्ये पसरणाऱ्या फ्लूचे म्हणजेच बर्ड फ्लूचे अनेक उपप्रकार आहेत. त्यातील H म्हणजे हेमाग्युलेटीन (Hemagglutinin) आणि N म्हणजे न्यूरामिनीडिज (Neuraminidase) हे दोन्ही या विषाणूचे प्रोटीन स्ट्रेन आहेत. आणि याच्याच उपप्रकारांना नंबर दिलेले आहेत. H म्हणजेच हेमाग्युलेटीनचे 18 उपप्रकार आहेत, तर N म्हणजेच न्यूरामिनीडिजचे 11 उपप्रकार आहेत. यातील फक्त H5, H7 आणि H10 याच स्ट्रेन माणसाच्या मृत्यू कारण ठरु शकतात. त्यामुळं H5N1 हा माणसांसाठी अधिक धोकादायक मानला जातो.
यामधील H17N10 आणि H18N11 हे फक्त वटवाघुळांमध्येच आढळतात. बाकी पक्षांमध्ये याचा प्रसार होत नाही.

बर्ड फ्लू’ हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.

1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.(Whatis bird flu? What are its symptoms? All information about bird flu)

चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का?

नाही. तसं करायची गरज नाही. चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही असं WHO ने म्हटलंय.

मांस शिजवताना ते उकळून शिजवावं, कच्चं वा आतून लाल राहू नयेत, अंडी पूर्णपणे उकडावीत असं WHOने म्हटलंय.

बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं

  • सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.
  • पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
  • संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
  • बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
  • जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
  • पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.

बर्ड फ्लूची लक्षणं काय?

बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ताप येणं, घशात खवखव होणं, वा जास्त इन्फेक्शन होणं, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणं, पित्त वा कफचा त्रास आणि रोग जास्त पसरला असल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. ही सगळी लक्षणं सध्याच्या कोरोना विषाणूंच्या लक्षणांशी मिळती-जुळती आहेत, त्यामुळं सध्याच्या काळात हा विषाणू धोकादायक ठरु शकतोWhatis bird flu

बर्ड फ्लूवर औषध आहे का?

बर्ड फ्लूवर औषध उपलब्ध आहेत. टॅमी फ्लूच्या गोळ्यांद्वारे हा रोग बरा होतो. त्यामुळं बर्ड फ्लू आल्यानंतर सरकार टॅमी फ्लूच्या (tamiflu) गोळ्यांचा साठा करणं सुरु करतं. याशिवाय रेलेन्झा (relenza), रॅपीवॅप (Rapivab) याही गोळ्या डॉक्टरांकडून दिल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये. कारण, टॅमी फ्लूसह इतर गोळ्यांची दुष्परिणामही होऊ शकतात.

अफवांना बळी न पडता तथ्य़ जाणून घेणं जास्त गरजेचं

कोरोनाला आपण जितकं गांभीर्यानं घ्यायला हवं होतं, तितकं सुरुवातीला घेतलं गेलं नाही, मात्र, जेव्हा बर्ड फ्लूचा प्रश्न येतो, तेव्हा तातडीनं पावलं उचलली जातात. जी अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, बर्ड फ्लू लगेच सगळ्या राज्यात पसरला असं होत नाही. ज्या राज्यात सध्या बर्ड फ्लूची प्रकरणं समोर आली आहेत, तिथल्या प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, गुजरातमध्ये पशूसंवर्धन विभागानं हायअलर्ट जारी केला आहे. त्यामुळं घाबरुन न जाता, अफवांना बळी न पडता तथ्य़ जाणून घेणं जास्त गरजेचं आहेWhatis bird flu

पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही

देशात सध्या पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे.

“महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही”, असं मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी पीटीआयला सांगितलं. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’मुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्येही ‘बर्ड फ्लू’ची प्रकरणं समोर आली आहेत. Whatis bird flu

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.