ylliX - Online Advertising Network

हे फोटोचे सत्य वाचा : तुमचा संताप होणार आहे …

सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला  वेळ लागत नाही. लोक ती गोष्ट अश्या प्रकारे फोरवर्ड करता की त्यांना सर्व सत्य माहित आहे. ते ती   गोष्ट चूक असो की बरोबर, बातमी खरी असो किंवा खोटी  शहानिशा सुद्धा करत नाहीत. त्याचा एक मोठे उदाहरण समोर आहे. यामध्ये मुस्लीम समाजातील एक  मौलवी आणि  हिंदू साधू यांचा एक  फोटो जोरदार  व्हायरल झाले आहेत. या फोटोत या दोघांना मध्ये  साधूनां मद्याचा ग्लास भरून देताना मौलवी दाखवले आहे.  फोटो पाहून लगेच कोणताही विचार न करता  अनेकांनी या दोघांवर सडकून टीका केली. तर अनेकांनी शिव्या देखील दिल्या आहेत. मात्र याचे सत्य बाहेर आले आहे. यामध्ये  हा फोटो एडिट केला असल्याची साधी शंकाही सुद्धा आली नाही.

हा आहे खरा फोटो दैनिक लोकसत्ता ने सत्य समोर आणले आहे,

जेव्हा सत्य बाहेर आले तेव्हा सर्व समोर आले आहे.  या फोटोत साधू आणि मौलवी मद्यपान करत नसून ते पाणी पित आहे. मौलवी पाण्याच्या बाटलीतून साधूंच्या हातात असणाऱ्या ग्लासमध्ये पाणी देत आहेत. मात्र  इंटरनेटवरील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो समाजकंटकाने  एडिट केला आहे.  पाण्याच्या बाटलीऐवजी तिथे दारूची बाटली दाखवली आहे. त्यामुळे फोटोचा वेगळा अर्थ निर्माण झाला.  पण साधूच्या हातात असलेल्या पाण्याचा ग्लास मात्र तसाच ठेवला, या एका चुकीमुळे व्हायरल झालेल्या फोटोचं सत्य उघड झालं आहे. मद्य घेत असलेला फोटो खोटा असून पाणी पीत असलेला फोटो खरा आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.