ylliX - Online Advertising Network

mucormycosis काय आहे म्यूकरमायकोसिस ( Black Fungus) आजार ?

अगोदरच देश covid-19 सारख्या मोठ्या संकटाशी लढत आहे आणि त्यातच आणखी एक भर म्हणजे म्युकरमायकोसिस आजाराने देशापुढे एक आणखी गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे. दिल्ली-मुंबई तसेच गुजरात मध्ये या रोगाचे बरेच पेशंट आढळून आलेले आहे आणि अहमदाबाद येथे अक्षरशः नऊ जनांचा मृत्यू झाल्याचे आढळून आलेले आहे नेमका हा आजार आला तरी कुठून या आजाराचीmucormycosis
लक्षणे काय हे आपण आज जाणून घेऊयात.What is mucormycosis (Black Fungus) disease?
म्युकरमायकोसिस हा एक बुरशीजन्य आजार आहे ज्याप्रकारे covid-19 हा वायरल डिसीज आहे त्याचप्रमाणे हा एक बुरशीजन्य रोग आहे. Covid-19 हा व्हायरसमुळे होतो म्हणून त्याला वायरस डिसीज म्हणतात त्याचप्रमाणे हा आजार फंगस मुळे होतो म्हणून याला फंगल डिसीज असे म्हणतात
mucormycosis

Fungal Disease म्हणजे काय?

जेव्हा आपल्याला इन्फेक्‍शन होते असे आपण म्हणतो तेव्हा नेमके काय होते तर तेव्हा काही सूक्ष्म जीव आपल्या शरीरात प्रवेश करतात असे त्याचा अर्थ होतो आणि ही सूक्ष्म जीव आपल्या शरीराला हानिकारक असतात ही सूक्ष्म जीव जेव्हा शरीराबाहेर वातावरणात असतात तेव्हा ते फारसे घातक नसतात परंतु शरीरात प्रवेश केल्यावर ते अगदी घातक सरूप साकारतात ज्यामध्ये ते Reproduction तसेच colonize करतात, व शरीराचा बराचसा भाग घेतात. याच शरीरात पसरलेल्या सूक्ष्म जीवांना “Pathogen” असे संबोधले जाते. ज्यामध्ये
• बॅक्टरिया
• व्हायरस
• फंगी
या मधलाच हा म्युकर मायकोसिस आजार आहे.
बुरशीजन्य आजार हे काही नवीन आजार आहेत असे नाही. हे आजार सर्वसाधारण आजार आहे. जे वातावरणातील सूक्ष्म जंतू पासून होतात. परंतु यातील काही आजार हे सौम्य प्रकारचे असतात. तर काही गंभीर स्वरूपाचे ही असतात. ज्यामध्ये फुफुसासारख्या अवयवात जर हा आजार झाला किंवा मेंदू पर्यंत पोहचला तर माणसाचा जीव जाण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. आणि असे बघायला पण मिळालेले आहे. गुजरात मधील मृत्यू झालेल्या ९ पैकी ६ रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता कारण त्यांचे फुप्फुसे संसर्गित झालेले होते.
बुरशीजन्य आजार नेमका शरीराच्या कोणत्या अवयवातून झालेला आहे यावर त्याचे गांभीर्य अवलंबून असते.

म्यूकर मायकोसीस बद्दल ?

हा एक प्रकारचा बुरशीजन्य रोग आहे. यालाच झायगोमायकोसिस असेही म्हणतात. हा एक गंभीर व दुर्मिळ बुरशीजन्य रोग आहे ज्याप्रमाणे Covid 19 हा Sarc या विषाणूमुळे होतो त्याचप्रमाणे हा SARS विषाणू मुळे होतो. त्याच प्रमाणे म्युकर मायकोसीस हा Group of molds called Mucermycytes मुळे होतो.
हे मोल्ड्स साधारणतः वातावरणात असतात. हा आजार झालेल्या पेशंटला त्वरित उपचार मिळाल्यास हा आजार भरायची होतो परंतु या आजारावर काळजीपूर्वक लक्ष न दिल्यास व उपचारास उशीर केल्यास हा आजार झपाट्याने शरीराच्या सर्व भागात पसरतो व अशातच रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
हे इन्फेक्शन नाकाद्वारे सुरू होऊन डोळ्या पर्यंत पसरतात त्यामुळे डोळ्याच्या जवळील स्नायू अर्धांगवायू होण्यास सुरुवात होते त्यामुळे आंधळेपणा होण्याची दाट शक्यता असते हे इन्फेक्शन जर मेंदूपर्यंत पोहोचले तर meningitis होण्याची शक्यता असते. ज्यामध्ये मेंदूला कव्हर करण्याची पातळ लेयर असते त्यावर सुजन येते.
हा काही नवीन रोग आहे असे नाही तर बऱ्याच आय सी मधील पेशंट मध्ये तसेच ट्रान्सप्लांट केलेल्या पेशंट मध्ये हा आजार आढळून येतो.
परंतु सध्या अचानक पणे कोव्हीडमधून बरे होऊन आलेल्या रुग्णांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक बघायला मिळत आहे त्यामुळे ही एक चिंतेची बाब झालेली आहे.
Covid-19 बरे झालेल्या रुग्णांना जास्त धोका का?mucormycosis
Covid-19 मधून बरे झालेल्या पेशंट ला पूर्वी बऱ्याच प्रकारच्या औषधी दिल्या गेलेल्या आहेत आणि या आजार अशी लढताना तसेही त्यांचे शरीर कमकुवत झालेले असते ज्यामुळे या जंतूंपासून बचाव करण्याची त्यांची क्षमता कमी झालेली असते व त्यामुळे हे जंतू अशा रुग्णांच्या शरीरात सहज रित्या पसरू शकते त्यामुळे अशा रुग्णांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
US center of disease control and Prevention च्या मते आजारी रुग्णांना किंवा कोणत्याही प्रकारच्या औषधे सुरू असलेल्या लोकांना हा आजार होऊ शकतो तसेच डायबिटीज व अन्य शारीरिक आजार असलेल्या व्यक्तींवर आहे याचा परिणाम जास्त प्रमाणात दिसून येऊ शकतो.
शरीराच्या कोणत्या भागातून हा आजार झालेला आहे यावर याची लक्षणे अवलंबून असते. जसे
नाकात किंवा मेंदूत हा आजार झाल्यास –
• एकीकडून चेहरा सुजणे
• डोकेदुखी
• अनुनासिक रक्त संचय
• नाकावर सूज येणे
• ज्वर
फुप्फुस मध्ये हा आजार झाल्यास –
• ज्वर
• खोकला
• छातीत दुखणे
• श्वास घेण्यास अडथळा

म्युकर मायकोसिस वरील उपचार?

• बर्‍याचशा पेशंटला अँटी फंगल औषधोपचार देऊन तसेच ज्या भागात हे ही बुरशी पसरलेली आहे त्या भागातील शस्त्रक्रिया करून यावर उपचार करता येतो.
• आपल्या अवतीभवती साफसफाई ठेवून वातावरणाला स्वच्छ ठेवणे व शरीराला स्वच्छ ठेवणे या रोगावर उपचाराचे काम करू शकते
• Covid-19 च्या रुग्णांना वाढविणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी दररोज व्यवस्थित जेवण करणे ताज्या फळ भाजी खाणे तसेच व्यायाम करणे आवश्यक आहे.mucormycosis
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.