What isa curfew जमावबंदी म्हणजे काय?

आंदोलने किंवा एखादा प्रश्न जास्त चिघळला तर अनेकदा आपण ऐकतो की Kalam 144, section 144, कलम 144 लागू केले आहे. मात्र हे आहे तरी काय ? का हा कलम लावतात ? याचा फायदा काय होतो. ? सरकार याचा उपयोग कसा करते असे अनेक प्रश्न समोर येतात.What isa curfew

र जाणून घेवूयात काय आहे कलम 144?
कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. कलम 144 हे फौजदारी दंडसंहिता 1973 मधील आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात. एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. सोप्या शब्दात सांगायचं तर जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं. या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.
जमावबंदी लागू असताना चार किंवा त्याहून जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी असते.

कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते.
जिल्हाधिकारी, एसडीएम (सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट), जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते. कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. सध्या अयोध्येतही दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. दोन महिन्यांनंतर नव्याने जमावबंदीचे आदेश देता येतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.
त्याचप्रमाणे अशी नोटीस एका खास भागात राहणाऱ्या आणि ज्या व्यक्तीमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका पोचेल अशा व्यक्तीला, व्यक्तींच्या समूहाला आणि त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना देखील बजावली जाऊ शकते.

सुरुवात बडोदा संस्थान
बडोदा संस्थान येथील महाराज गायकवाड यांचे आयपीएस अधिकारी होते राज रतन एफ.एफ. डेबु. त्या संस्थान मध्ये शांतात कायदा व्यवस्था जबाबदारी त्यांच्या कडे होती. तेव्हा जातीय किंवा अन्य दंगे झाले तर मोठे नुकसान होत असे, मग असे होतांना काय करावे असा प्रश्न पडला मग त्यांनी त्यांच्या युद्ध शस्त्राचा अभ्यास करत कलम144 शोधून काढले. याचा पहिला उपयोग आहे की नागरिकांचे सर्व हक्क बंद करत त्या ठिकाणी शांतात निर्माण करणे होय. याचा फार मोठा उपयोग झाला तेव्हा महाराज गायकवाड यांनी सुवर्ण पदक देवून आयपीएस अधिकारी राज रतन एफ.एफ. डेबु यांचा नागरी सत्कार केला होता. मग चांगली गोष्ट ब्रिटीश घेणार नाही ते ब्रिटीश कसले; त्याच 1861 साली त्यांनी हा कायदा करत उपयोगात आणायला सुरुवात केली.
बेळगाव पोलीसांनी शहरात सीआरपीसी कलम 144 अन्वये बुधवार 18 डिसेंबर राञी 9 वाजेपासून ते शनिवार 21 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. बेळगावात विधेयकाच्या समर्थनात मोर्चा काढण्याची मागणी सोशल मिडीयावर होत आहे. त्यामुळे विधेयकाच्या विरोधात किंव्हा समर्थनात मोर्चा होण्याची शक्यता नाकरता येत नाही त्यामुळे खबरदारी घेण्यात आली.
पुढील चार-पाच दिवसांत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात व कायद्याच्या समर्थनात मोर्चा, आंदोलने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्याची सूचना राज्य पोलीस महासंचालक निलमनी एस. राजू यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. कलम 144 अन्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून 21 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश जारी असणार आहे. या काळात मोर्चा, आंदोलने, सभा घेणे आदींवर बंदी असणार आहे.
नागरिकत्व विधेयकाविरोधात देशात तीव्र आंदोलन होत आहे. मंगळवारी बेळगावात आंदोलनानंतर दगडफेक झाली तर देशभरात अनेक ठिकाणी रेल्वे गाड्या व ईतर वाहने जाळली आहेत. अनेक यूनिव्हर्सिटीमध्येही विद्यार्थ्यांनी दोरदार प्रदर्शन केले. तर काही ठिकाणी दगडफेक केल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. म्हणूनच बेळगांवमध्ये कलम 144 लागू करण्यात येणार आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (कॅब CAB / CAA) च्या विरोधात बर्‍याच भागात हिंसक निदर्शने झाली आहेत. हे लक्षात घेता स्थानिक प्रशासन अलर्ट झालं असून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदबस्त आखण्यात आला आहे. एकत्रित जमून विरोध अथवा समर्थन / पाठिंबा दर्शविणे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.What isa curfew

 

जमावबंदी म्हणजे काय?

१४४ कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात येते. यात स्थानिक पातळीवर पोलिस वेळोवेळी जमावबंदीचे आदेश देऊ शकतात. यात ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. जर ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आले तर अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते. या जमाव बंदीत पाच किंवा अधिक लोक एकत्रित येऊन एखादा कार्यक्रम घेऊ शकत नाहीत किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करू शकत नाहीत. तसेच, लग्नकार्यही या काळात करु शकत नाही. जर यातील कोणतीही बाब केली तर जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारावाई होई शकते. दरम्यान, भाजीपाला, घरातील किराणा सामान हे बाहेर जाऊन आणण्याची मुभा जमावबंदीत असते. पाचपेक्षा कमी लोक असतील आणि जर त्यांना पोलिसांनी अडविले तर बाहेर जाण्याचे ठोस कारण त्यांनी पोलिसांना सांगणे अपेक्षित असते.  आता जाणून घेऊयात संचारबंदी म्हणजे काय?What isa curfew

जमावबंदी म्हणजे काय?
What is a curfew

संचारबंदी म्हणजे काय ?

संचारबंदी लागू झाल्यास नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लावले जातात. त्यास ‘कर्फ्यू’ असेही संबोधले जाते. कलम १४४ मधील तरतुदीनुसार जमावबंदी आणि संचारबंदी लागू होते. संचारबंदीत निवडण्यात आलेली ठिकाणे किंवा परिसरात नागरिकांना बाहेर पडता येत नाही. सरकार ही बंदी दंगल किंवा आपत्कालीन परिस्थितीत लागू करु शकते. जमावबंदीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी नागरिकांना संचार करता येतो; मात्र संचारबंदीमध्ये नागरिकांना घराबाहेर पडण्याचीही मुभा नसते. संचारबंदी ही त्या-त्या क्षेत्रात जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त लागू करतात. संचारबंदी लागू केली गेली अशी जर अफवा येत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलेली संचारबंदी ही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे असून जिचकी कमी गर्दी होईल तितक्या लवकर या संकटातून संपूर्ण जग वाचवता येऊ शकते. त्यामूळे उगाच आत्मविश्वास दाखवू नका आणि मला काही होणार नाही या गैरसमजाने घराबाहेर पडू नका. सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करा आणि सरकारला सहकार्य करा.What isa curfew

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.