Mona Lisa painting मोनालिसाच्या चित्राची वैशिष्टये काय आहेत? ते चित्र इतके महाग का आहे?

एखाद्या व्यक्तीचित्रात ओठ रेखाटण्यासाठी साधारण किती वेळ लागतो ? १०-१५ मिनिटे ... फार बारकाईने लक्षपूर्वक रेखटल्यास अर्धा एक तास . पण मोनाचे फक्त ओठ काढण्यासाठी तब्बल १२ वर्षे लागली ….. !Mona Lisa painting


आजवरची जगातली सर्वोत्तम कलाकृती कोणती असा प्रश्न जर आला तर त्यात मोनालिसाचे चित्र अग्रक्रमाने येईल ! जगप्रसिद्ध चित्रकार , वैज्ञानिक जाणकार , लेखक आणि तत्त्ववेत्ता लिओनार्दो द विन्सी हा या चित्राचा जन्मदाता ! हे चित्र त्याने १५०३ ते १५१७ या तब्बल १४ वर्षांच्या दीर्घ कालखंडात रेखाटलं ! म्हणजे या चित्राला पूर्ण होऊन आज झाली आहेत ५०० पेक्षा अधिक वर्षे . एखादी कलाकृती तब्बल ५०० वर्षे जनमानसात जिवंत राहते याचा अर्थ त्या कलाकृतीत नक्कीच काहीतरी वेगळेपण असावं !

काय विशेषता आहे या चित्रात ? चित्रातली मोनालिसा कोण आहे ?

या चित्राबद्दलच्या काही खास गोष्टी ….

  • सर्वात प्रसिद्ध आहे मोनालिसाचं हास्य ! ती स्माईल .. ! काही जाणकारांनी तर्क लावला होता की विन्सिला या हस्यातून काहीतरी सांगायचं होतं , काहीतरी गूढ संदेश त्या हस्यतून अभिप्रेत होतो , म्हणून ते हास्य स्पष्ट दिसत नाही , बारकाईने पाहिल्यास ते हास्य वाटतच नाही किंवा वेगवेगळ्या कोनांतून बघितल्यास त्या हास्याच्या वेगवेगळ्या छटा दिसतात ! पण २००० साली हार्वर्ड विद्यापीठातले न्युरोलॉजिस्ट डॉक्टर मार्गारेट यांनी सांगितलं की मोनालिसाचं हास्य नाही बदलत , ते स्थिर आहे ! तिचं हास्य हे पूर्णपणे बघणाऱ्याच्या मानसिक स्थितीवर अवलंबून आहे ! आपल्याला जसं बघायचं असेल तसं ते हास्य आपल्याला दिसतं ! ही या चित्राची खूप मोठी विशेषता आहे !
  • लिओनार्दो द विन्सि याने हे चित्र वयाच्या ५१ व्यां वर्षी बनवायला सुरुवात केली होती. १५०३ साली हे चित्र सुरू झालं आणि १५१७ मध्ये या चित्राचं काम थांबलं ! चित्र जवळजवळ आटोक्यात आलं होतं पण विन्सिला त्यात अजून भरपूर गोष्टी घालायच्या होत्या. आणि त्यासाठी त्याचं विचारचक्र सतत सुरू असायचं पण त्या काळात विन्सि आजारी पडला आणि चित्र थांबण्याच्या दोन वर्षांनी १५१९ साली विन्सिचं निधन झालं ! बघणाऱ्यांच्या दृष्टीने ते चित्र पूर्ण होतं पण विन्सि शेवटपर्यंत या चित्राच्या बाबतीत विचार करत होता. त्याने ठरवलेल्या आणखी गोष्टी ज्या चित्रात घालायच्या होत्या त्या कायमच्याच राहून गेल्या ! मोनाचे ओठ काढण्यासाठी त्याने १२ वर्षे घेतली . इतकी वर्षे दीर्घ मेहनत घेतल्यानेच कदाचित ते हास्य इतकं आकर्षक असावं !
  • २३ जून १८५२ या दिवशी ल्यूक मासपॅरो नामक एका फ्रेंच चित्रकाराने पॅरिस मधील एका मोठ्या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्याच्या खोलीत जेव्हा तपास करण्यात आला त्यावेळी एक पत्र सापडलं , त्या पत्रात त्याने मोनालीसावरच्या त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. तो तिच्या हस्यावर भाळला होता. आणि भावनेच्या भरात त्याने आत्महत्या केली होती.
  • ही पेंटींग फ्रान्सच्या लूव्र येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. या पेंटींग साठी जगभरातून अनेक लोक या संग्रहालयाला भेट देतात. १९५६ साली पर्यटनासाठी आलेल्या बोलिव्हियाच्या एका व्यक्तीने या चित्रावर दगड फेकून मारला होता , ज्यामुळे मोनालिसाच्या हाताच्या भागावर डाग पडले. चित्राला पुन्हा रिकव्हर केलं गेलं. पण तिथून पुढेही या चित्रावर अनेक हल्ले झाले , एका व्यक्तीने चित्रावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला तर एका महिलेने चित्रावर ॲसीड फेकण्याचा प्रयत्न केला.तर एका महिलेने सिरॅमिकचा कप या चित्रावर फेकला. त्यामुळे नंतर या चित्राची जागाच बदलली गेली आणि सुरक्षित अशा बुलेटप्रुफ काचेत हे चित्र ठेवण्यात आलं ! एक वेगळी जागा तयार करण्यात आली जिला एकूण ५० कोटींचा खर्च आला. आता त्या जागेत मोनालिसा सुरक्षित आहे !
  • चित्र कुठल्याच कागदावर किंवा कापडावर काढलेलं नाही ! एका लाकडाच्या पाटीवर हे चित्र काढलं आहे. हे चित्र खूप छोटं आहे , मूळ फ्रेमचा आकार ३०/२१ इंच इतका आहे आणि एकूण वजन ८ किलो. मूळ चित्र आजही जतन केलेलं आहे . या चित्रावर रंगांचे एकूण ३० थर आहेत. आणि काही थर तर माणसाच्या एका केसापेक्षाही जास्त बारीक आहेत. इतकी मजबूत डीटेलिंग केलेली आहे !
  • मोनालिसा ही जगातली सर्वात मौल्यवान कलाकृती आहे ! आणि सर्वात महाग पेंटींग सुद्धा. १९८२ साली या चित्राची किंमत १०० मिलियन डॉलर इतकी होती तर २०१९ साली ती ७०० मिलियन डॉलर इतकी झाली. पण फ्रान्स सरकारच्या निर्णयनुसार ही कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही म्हणून ती विकली जाऊ शकत नाही आणि कुणीही तिला विकत घेऊ शकत नाही ! तो पूर्णपणे ऐतिहासिक ऐवज आहे !
  • विन्सिच्या निधनानंतर ही पेंटींग इटलीच्या राजांच्या खाजगी कलादालनात राहिली. मग पुढे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर ती फ्रान्समध्ये आणली गेली. नेपोलियन बोनापार्टला ही पेंटींग खूप आवडली होती त्यामुळे काही वर्षे ती नेपोलियनच्या बेडरुम मध्ये राहिली.
  • मोनालिसाला इंग्रजीतून Mona Lisa असं लिहिलं जातं. पण ही स्पेलिंग योग्य नाही , Monna Lisa ही मूळ स्पेलिंग आहे. ज्याचं उच्चारण ‘ मोन्ना लिझा ‘ असं होतं. हा मूळ इटालियन शब्द आहे. ज्याचा अर्थ ” माय लेडी ” म्हणजे ‘ माझी स्त्री ‘ असा होतो !

मोनालिसा प्रसिद्ध आहे…

पण मोनालिसा प्रसिद्ध का आहे ? तिला प्रसिद्धी कधीपासून मिळाली ?

खरंतर पूर्ण झाल्यापासून आणि लिओनार्दो द विन्सि या ख्यातनाम कलाकाराचं नाव मिळाल्यापासूनच मोनालिसा प्रसिद्ध आहे. शिवाय चित्राच्या सौंदर्याने बघणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पाडली होती , राजांच्या कलादालनापासून ते प्रसिद्ध व्यक्तींच्या पसंतीने मोनालिसाला प्रसिद्धी मिळवून दिली होती.

पण मागच्या शतकात एक घटना घडली. ज्यामुळे मोनालिसा जगाच्या आणखी कानाकोपऱ्यात पोचली.

२१ ऑगस्ट १९११ या दिवशी फ्रान्सच्या लुव्र संग्रहालयातून मोनालिसाची मूळ पेंटींग चोरीला गेली. सगळीकडे ही बातमी पसरली. चर्चा होऊ लागली. आणि त्या चर्चेत आणि भर तेव्हा पडली जेव्हा या पेंटिंगच्या चोरीचे आरोप केले गेले विसाव्या शतकातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक ‘ सर पाब्लो पिकासो ‘ यांच्यावर !

ही गोष्ट गंभीर होती. एवढ्या मोठ्या कलाकारावर असा आरोप लावणे म्हणजे त्या कलाकाराचा स्पष्ट अपमान. अनेक ठिकाणांहून नाराजीचे सूर ऐकू पडू लागले. पिकासो यांना पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं. काही काळाने हे आरोप मिटवले गेले.पुढे काही दिवसांनी तपास केल्यानंतर एक मोठी गोष्ट समोर आली. की पेंटिंग ही संग्रहालयात काम करणाऱ्या एका कामगारानेच चोरी केली होती. त्या कामगाराचं नाव होतं ‘ विन्सेंझो पेरुगिया ‘ ! संग्रहालय बंद व्हायच्या काही काळाआधी तो एका खोलीत शिरला आणि खोली बंद करून घेतली. संग्रहालय बंद झालं तेव्हा तो बाहेर आला आणि फ्रेम काढून घेतली.फ्रेम कोटात लपवून तो बाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी इटलीमध्ये निघून आला.

( पेंटिंग चोरीला गेली तेव्हाची रिकामी जागा )

पुढची दोन वर्षे मोनालिसाची पेंटिंग संपूर्ण जगापासून अलिप्त होती

विन्सेंझो पेरुगिया हा इटलीचा एक नागरिक होता. देशभक्त होता. मोनालिसाची प्रसिद्धी पाहता त्याला नेहमी वाटायचं की ” ही पेंटींग तर आपल्या देशाची – इटलीची आहे. मग ती आपल्या देशात का नाही आणि फ्रान्स मध्ये का आहे ? प्रसिद्धीचा फायदा सुद्धा फ्रान्स देशालाच मिळतो. आपली पेंटींग आपल्याच देशात हवी. ” या विचाराने त्याने पेंटिंग आपल्या देशात नेण्याचं ठरवलं आणि तसं केलंही !

( विन्सेंझो पेरुगिया )

दोन वर्षांनी डिसेंबर १९१३ मध्ये तो वातावरण शांत झाल्यावर ती पेंटींग इटलीच्या फ्लॉरेन्स शहरातल्या आर्ट म्युझियमच्या डायरेक्टरला द्यायला गेला. आणि तिथून तो पकडला गेला. विन्सेंझोला अटक झाली. आणि दोन आठवडे ती पेंटींग त्याच म्युझियम मध्ये ठेवल्यावर ४ जानेवारी १९१४ ला तिला पुन्हा फ्रान्स मध्ये आणलं गेलं !

( पेंटींग पुन्हा फ्रान्स मध्ये आल्यानंतर … )

विन्सेंझोला सहा महिन्यांची शिक्षा झाली. आणि नंतर त्याला माफ केलं गेलं. कारण त्याने जे काही केलं होतं ते देशासाठी केलं होतं. त्याच्या देशभक्तीचं कौतुकच झालं. या प्रकरणाची चर्चाही जगभर झाली. पण अखेरीस पेंटींग परत मिळाली !


मोनालिसा मूळ इटलीची असून फ्रान्स मध्ये का आहे ?

१५१६ साली लिओनार्दो फ्रान्सचा राजा ‘ फ्रान्सिस ‘ च्या निमंत्रणावरून फ्रान्सला गेला. सोबत मोनालिसाला सुद्धा घेऊन गेला. तीन वर्षे तो फ्रान्स मध्येच होता. या तीनही वर्षांत तो चित्रावर काम करतच होता. १५१९ साली तो आजारी पडला. शेवटच्या काळात त्याने मोनालिसाची जबाबदारी त्याचा शिष्य ” सलाई ” याच्याकडे सोपवली. लिओनार्दोच्या निधनानंतर काही काळ मोनालिसा राजवाड्यातच होती. पुढे सलाईने पेंटींग राजा फ्रान्सिसला देऊन टाकली. मोबदला म्हणून राजाने सलाईला ४००० सोन्याची नाणी दिली ! थोडक्यात इथे खरेदी – विक्रीचा सौदा झाला होता ! काही काळ पेंटींग ‘ पॅलेस ऑफ फौंटनब्लो ‘ येथे ठेवली गेली. तर पुढचा राजा ‘ किंग लुईस ‘ याने पेंटिंग ‘ पॅलेस ऑफ वैर्साईस ‘ इथे पाठवली ! १७९७ च्या फ्रेंच राज्यक्रांती नंतर ही पेंटींग लूव्र संग्रहालयात पाठवली गेली ! त्यामुळे पेंटींग आज फ्रान्सच्या ताब्यात आहे !

खरंतर इटली प्रयत्न करतो आहे की पेंटींगला पुन्हा मायदेशी आणलं जावं ! पण फ्रान्स द्यायला तयार होत नाहीये ! फ्रान्स देशाने दोन महत्त्वाची करणं सांगितली आहेत ….

१ :- पेंटींग आता खूप जुनी झाली आहे , आणि म्हणूनच खूप नाजूक सुद्धा ! पेंटींग अनेक वेळा रिपेअर केली गेलेली आहे. त्यामुळे मोठा प्रवास झाल्याने पेंटींगला जर काही झालं तर ते नुकसान भरून काढता येणं अवघड होऊन जाईल ! जे की दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार नाही ! दोन देशांच्या वादात उगाच ऐतिहासिक दस्तऐवजाचं नुकसान !

२:- आम्ही ही पेंटींग विकत घेतली आहे , तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हीही विकत घ्या !

पण हे विकत घेणं अजिबातच परवडण्यासारखं नाहीये ! कारण पेंटींगची २०२० सालची किंमत होती ८५० मिलियन डॉलर ! भारतीय रुपयांत ६४ अरब , ४५ कोटी , ६३ लाख ५० हजार रुपये !!!

प्रश्न होता की पेंटिंग इतकी महाग का आहे ?

याच कारणामुळे

फ्रान्स मध्ये दरवर्षी वर्षभरात एक कोटी पेक्षा जास्त लोक संग्रहालयाला भेट देण्यासाठी येतात. आणि पैकी ८०% लोक फक्त मोनालिसाला बघण्यासाठी येतात. तिला प्रेमपत्र देतात , फुलं देतात !

यामुळे पेंटींगची मार्केट व्हॅल्यू प्रचंड आहे !


आता महत्त्वाचा प्रश्न ….

मोनालिसा कोण आहे ?

लिओनार्डोचा शिष्य सलाईने त्याच्या खाजगी पत्रांत काही गोष्टी नमूद केल्या होत्या ! त्या पत्रांत त्याने लिहिलं होतं की १५२४ साली त्याच्याकडे एक पेंटींग होती. जी सर लिओनार्दो यांनी त्याच्याकडे सोपवली होती. तिचं नाव त्याने ” ला जिओकोंडा ” असं नमूद केलं होतं ! पण तीच मोनालिसा होती का ? याची खात्री सांगता येत नाही !

१५५० साली एका फ्रेंच कलाइतिहासकाराने लिओनार्डो द व्हीन्सीची बायोग्रफी लिहिली होती. जी लिओनार्दोवर लिहिली गेलेली पहिली बायोग्राफी होती ! त्या इतिहासकाराचं नाव होतं ‘ जॉर्जिओ व्हसारी ‘ ! त्याने लिहिलेल्या पुस्तकात पहिल्यांदा “मोनालिसा” हा शब्द आढळतो !

त्याने लिहिलं होतं की ” लिओनार्दोने शेवटच्या काळात त्याचा एक मित्र ‘ फ्रान्सिस्को डेल जिओकोंडो ‘ याच्या बायकोचं चित्र काढलं होतं , जीचं नाव होतं ‘ मॅडम लीझा ‘ ! तिच मोनालिसा !

पण बरेचसे जाणकार व्हसारीने लिहिलेल्या तथ्यांवर विश्वास ठेवायला तयार नव्हते . कारण त्याने पुस्तक लिहिलं होतं लिओनार्डो गेल्याच्या ३१ वर्षांनी . जाणकार म्हणतात की कदाचित त्याच्याकडे ठोस माहिती नव्हती ! त्याने काही गोष्टी अंदाज लाऊन लिहिलेल्या आहेत ! म्हणून पुर्णपणे विश्वास ठेवणे योग्य नाही !

पण २००५ साली जर्मनीच्या ‘ हाईडलबर्ग विद्यापीठात ‘ एका विद्यार्थ्याने लायब्ररीत एक ५०० वर्षांपूर्वीच्या एका नोट्सच्या गठ्ठयांत एक छोटासा हाताने लिहिलेला कागद शोधला त्या कागदावर लिहिलेलं होतं लिओनार्दोच्याच काळातल्या एका व्यक्तीने ज्याचं नाव होतं ‘ अगस्तीनो वॅस्पूसी ‘ !Mona Lisa painting

त्याने त्या कागदावर १५०३ साली एका तत्कालीन चित्रकार ॲपेलीस याची तुलना लिओनार्दोशी केली होती त्यात त्याने लिहिलं की लिओनार्डो सध्या ‘ लीझा डेल जिओकोंडो ‘ नावाच्या महिलेचं चित्र काढत आहे !

यावरून हे स्पष्ट होतं की लीझाच मोनालिसा आहे !

हाह 😌 अखेर रहस्याचा उलगडा झालाच !

.

.

.

झाला का ?

.

.

.

नाही झाला !

कारण त्या काळात लिओनार्डो जे चित्र काढत होता ते व्यापाऱ्याच्या बायकोचंच होतं ! पण ……

जे चित्र आज मोनालिसा या नावाने प्रसिद्ध आहे ते व्यापाऱ्याच्या बायकोचं नाहीये …. !!!

.

.

“पास्कल कोट ” नावाचे एक खूप मोठे वैज्ञानिक आहे ज्यांना मोनालिसाचं खूप वेड आहे . मोनालिसाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून लूव्र संग्रहालयाने पास्कल यांना परवानगी दिली होती.तेव्हा त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पेंटींगच्या लेयर्सचा म्हणजेच थरांचा अभ्यास केला.Mona Lisa painting

त्यात त्यांना कळलं की चित्रातल्या मोनालिसाच्या चेहऱ्याखाली आणखी एक चेहरा आहे ! जो की मोनालिसाच्या चेहऱ्यापेक्षा वेगळा आहे. मोनालिसा हसताना दिसते पन दुसरा चेहरा सामान्य स्थितीत आहे. तो हसत नाहीये !

लिओनार्दोचा एक शिष्य होता ! राफेल नावाचा त्याने १५०४ साली लिओनार्डोने बनवलेल्या पेंटींग वरून त्याची एक कॉपी बनवली ! जी की अशी दिसत होतीMona Lisa painting

जाणकार मानतात की लिओनार्डोने दोन पेंटिंग्ज बनवल्या असाव्यात ! कारण राफेलनी जर मोनालिसाची पेंटींग बनवली असेल तर स्पष्ट दिसतंय की मोनालिसा आणि राफेलने बनवलेल्या चित्रांत खूप फरक आहे. राफेलच्या चित्रातली महिला एक २०-२५ वर्षांची तरुणी दिसते तर मोनालिसा एक प्रौढ स्त्री वाटते ३५- ४० वयादरम्यानची !

पास्कल कोट यांनी दुसऱ्या चेहऱ्याची एक डिजिटल आकृती बनवून त्याची कलर प्रिंट बनवली जी की अशी दिसते !

ही स्त्री राफेलच्या चीत्राशी साम्य साधून आहे. त्यामुळे इथेच स्पष्ट होतं की हीच लीझा जिओकोंडो आहे ! कारण तिचा जन्म होता १४७९ चा आणि पेंटींग बनवली गेली १५०४ मध्ये ! म्हणजेच लीझा जिओकोंडो त्यावेळी होती २५ वर्षांची ! आणि मोनालिसाच्या चित्रातली स्त्री प्रौढ दिसतेMona Lisa painting

पास्कल यांनी केलेलं संशोधन पूर्णपणे योग्य ठरतं कारण राफेलच्या चित्राचा एक मजबूत पुरावा समोर येतो. म्हणजेच लिओनार्डोने लीझा जिओकोंडोच्याच चित्रावर आणखी पुढे काम केलेलं आहे. मूळ लीझा जिओकोंडोचं तयार चित्र त्याने जिओकोंडो परिवाराला दिलं की नाही दिलं हे मात्र कोडं आहे. कदाचित दिलं नसावं आणि त्याच चित्रावर पुढे काम केलेलं असावं. म्हणून चित्रावर ३० थर आहेत !


मग या चित्रातली मोनालिसा कोण ?Mona Lisa painting

चित्रात आपल्याला दिसणारी मोनालिसा अस्तित्वातच नाहीये !

हो ! लिओनार्डोने पुढे कल्पनेतून एक स्त्री साकारली आहे. कारण त्याने त्या स्त्रीला जो पोशाख घातलेला आहे तसा पोशाख पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात स्त्रियांच्या वापरातच नव्हता ! चित्रातली स्त्री एक ख्रिस्त संस्कृतीतली पवित्र स्त्री आहे !

लिओनार्डो खूप कसलेला कलाकार होता. तो कुणाचंही चित्र हुबेहूब काढू शकत होता. पण त्याला त्याची आई कोण होती हे माहिती नव्हतं. कारण लिओनार्डो हा त्याच्या वडिलांचा समाजमान्य नसलेला अनौरस पुत्र होता ! लिओनार्डोने त्याच्या आईला कधीच बघितलं नव्हतं. म्हणून त्याच्या आईबद्दल त्याला विशेष आत्मीयता होती. लिओनार्दोच्या इतरही बऱ्याच चित्राकडे बघितलं तर कळेल की बहुतकरून चित्रांचा विषय असतो मुलाकडे वात्सल्य दृष्टीने बघणारी त्याची आई ! आणि त्या चित्रांमध्ये ही तेच हास्य त्या आईच्या चेहऱ्यावर असतं !

लिओनार्डोने चित्रात स्वतः च्या चेहऱ्याच्या ‘ फेशियल फीचर्स ‘ च्या छटा टाकल्या होत्या.म्हणून बरेचजण म्हणतात की ते चित्र लिओनार्डोचंच स्त्रीरुप आहे. पण ते खरं नाही ! त्या फक्त काही छटा आहेत.

इतर चित्रांशी जर या चित्राची तुलना केली. तर एक निष्कर्ष निघतो.

इतर चित्रांत आई आणि मुलगा दाखवलेला आहे.आणि त्या चित्रांत आई मुलाकडे ममतेने वात्सल्य दृष्टीने बघत आहे. आणि या मोनालिसाच्या चित्रातली ती प्रौढ स्त्री सुद्धा त्याच मातेच्या ममतेने , वात्सल्य दृष्टीने तिच्या मुलाकडे म्हणजेच चित्रकाराकडे बघते आहे.

आणि चित्रकार कोण आहे ????

.

.

.

लिओनार्डो द व्हिन्सी …….!

हा एक मजबूत तर्क निघतो .. !

पण या तर्काला काही पुरावा आहे का 😏 ?

हो !

‘ सिग्मंड फ्रॉइड ‘ हे मोठे सायकोलॉजिस्ट आहेत.यांनी लिओनार्डोच्या चित्रांचा अभ्यास करून १९१० साली एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकात त्यांनी शेवटी लिहिलं की मोनालिसाचं चित्र बाकी काहीही नसून लिओनार्डोचं त्याच्या आईप्रती असलेलं गहिरं प्रेम आहे !Mona Lisa painting

यावरून हा तर्क सुद्धा खरा हे सिद्ध होण्यासाठी मदत होते !


एक भयानक फॅक्ट…

मागील वर्षांत ‘ पॅरानॉर्मल क्रुसीबल ‘ या वेबसाईटने एक मुद्दा मांडला होता. की मोनालिसाची पेंटिंग एका बाजूने सरळ आणि दुसऱ्या बाजूने मिरर फॉर्म मध्ये बदलून विरुद्ध बाजूंनी एकत्र लावल्यास मध्यभागी एखाद्या एलियन सारखं चित्र तयार होतं.हे खरं तर आहे. असं एक चित्र तयार तर होतंच. ते म्हणतात की कदाचित लिओनार्डोला यामधून काहीतरी सांगायचं आहे. ही गोष्ट विचार करण्यासारखी नक्कीच आहे. कारण लिओनार्डो अंतराळ विज्ञानाचा एक गाढा अभ्यासक होता. त्याने केलेलं संशोधन सुद्धा उपलब्ध आहे. मग खरंच त्याला एलियन बद्दल काही सांगायचं असेल का येणाऱ्या पिढीला ???Mona Lisa painting

डोकं तर तेव्हा हँग व्हायला लागतं जेव्हा कळतं की जी बाजू दुसऱ्या बाजूशी एकत्र जोडल्यावर एलियन तयार होतो त्याच बाजूच्या एका कोपऱ्यात इटालीयन भाषेत लिहिलं आहे ” La Risposta Si Trova Qui “

ज्याचा अर्थ होतो The Answer Is Here ! म्हणजेच ” उत्तर येथे आहे “Mona Lisa painting

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.