ylliX - Online Advertising Network

Thackeray Shinde family ठाकरे आणि शिंदे कुटुंबात लग्नसोहळा होणार

पुणे : सध्या राज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. दसरा मेळाव्यात देखील त्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले . अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या वडगाव सहानी येथील ठाकरे – शिंदे यांच्या लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत असुन यांचा शुभ विवाह सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कटुता विसरून पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा शिंदे कुटुंबाने या निमित्ताने व्यक्त केली आहे.Thackeray Shinde family

पुण्याच्या जुन्नर तालुक्यात हे लग्न आहे. या पत्रिकेने पुण्याचेच नाही तर राज्याचे लक्ष वेधले आहे. एकीकडे राजकारणात शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकमेकांविरोधात उभे ठाकलेले असताना या शिंदे आणि ठाकरे कुटुंबात दिलजमाईचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. ही पत्रिका पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देऊ लागले आहेत.

वडगावसहाणी गावातील शिवसेनेचे माजी विभागप्रमुख आणि सरपंच खंडेराव विश्राम शिंदे यांचा मुलगा विशाल आणि  आंबेगाव तालुक्यातील साल गावची कन्या  अनुराधा ठाकरे यांचा विवाह येत्या ८ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेतील वर्चस्वावरून ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. एकाच घरातील व्यक्ती या दोन गटांत विखुरले गेले आहेत. परंतू, लग्नसोहळा असल्याने ठाकरे, शिंदे गट विसरून शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक या लग्नाला आवर्जून जाणार आहेत.त्यांच्या लग्नपत्रिकेमुळे पुणे जिल्ह्यात सध्या शिंदे व ठाकरे यांच्या नव्या नातेसंबंधामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये या सध्याच्या राजकीय तणावाच्या वातावरणातही लग्नपत्रिका पाहून चेहर्‍यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

शिंदे कुटुंबातील नवरदेव विशाल याने जसे आम्ही ठाकरे कुटुंबाशी जुळवून घेतले आहे . तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी हेवेदावे विसरून एकत्र यायला हवे असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या विवाह सोहळ्याला स्थानिक आमदार, खासदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा विवाह सोहळा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या शनिवारी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे कुटुंब या निमित्ताने एकत्र येणार आहेत त्यांचे पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. यामिनित्ताने तरी दोन्ही गटातील कटुता कमी होणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune: Shiv Sena Chief Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde are currently in a heated discussion in the state. After the vertical split in Shiv Sena, the leaders and officials of both groups have come face to face. Even in the Dussehra gathering, they accused each other. Similarly, Thackeray-Shinde’s wedding card from Vadgaon Sahani in Junnar taluka of Pune district is going viral and their auspicious wedding ceremony is going to take place. On this occasion, the Shinde family has expressed the hope that Uddhav Thackeray and Chief Minister Eknath Shinde forget their bitterness and come together again.

This marriage is in Junnar taluk of Pune. This pamphlet has attracted the attention of not only Pune but the state. On the one hand, Shinde and Thackeray family are standing against each other in politics, Diljamai is being discussed everywhere in this Shinde and Thackeray family. Netizens have started giving different reactions after seeing this magazine. The marriage of Vishal, son of former head of Shiv Sena and sarpanch Khanderao Vishram Shinde of Vadgaon Sahani village and Anuradha Thackeray, daughter of Sal village in Ambegaon taluka, has been organized on October 8. Importantly, two factions namely Thackeray and Shinde have fallen due to dominance in Shiv Sena. Individuals from the same household are split into two groups. However, because of the wedding ceremony, Shiv Sena officials and Shiv Sainiks are going to forget about Thackeray and Shinde group and insist on this marriage. Due to their marriage certificate, the new relationship of Shinde and Thackeray in Pune district is making the common people happy even in this current political tension. So the people are well entertained.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.