लोकसभेच्या जिल्हयातील युतीच्या सर्व जागा निवडून आणणार – नाशिक भाजपा – शिवसेना बैठक

भाजपा शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत निर्धार

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभेच्या तिन्ही जागा एकदिलाने आणि एकजुटीने लढवून फिर एक बार मोदी सरकार हा नारा सार्थ ठरविण्याचा तसेच रविवार दि.17 मार्चला दुपारी 3.00 वाजता चोपडा बँक्वेट हॉल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागाचा संयुक्त मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार भाजपा वसंतस्मृती कार्यालयात झालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाजपा आणि शिवसेनेच्या मान्यवर नेत्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. यावेळी शिस्तबद्ध प्रचार आणि प्रभावी नियोजनासाठी समन्वय समितीची घोषणा यावेळी विभागीय समन्वयक ना.दादा भुसे यांनी केल्यानंतर भाजपा-शिवसेना युतीचा विजय असो आदी घोषणांनी परिसर दणाणले होते. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत काही काळ दुरावा होता. मात्र आमच्यात मनभेद कधीच नव्हते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आदेश देतील त्याचे पालन केले जाईल. एकमेकांशी सातत्याने संपर्क साधून एकोपा कायम टिकवला जाईल. युतीधर्म पाळला जाईल. प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त फळी उभारण्याचा निर्णयही यावेळी झाला.

बैठकीस भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप,  प्रदेश प्रवक्ता प्रा.सुहास फरांदे, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, शिवसेना खासदार हेमंत गोडसे, भाजपा आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल आहेर तसेच शिवसेना आमदार अनिल कदम, योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनिल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, ज्येष्ठ नेते विजय साने, भाजपा संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे, नंदकुमार खैरनार, शिवसेना महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, भाजपा सरचिटणीस पवन भगुरकर, उत्तमराव उगले, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, सुधाकर बडगुजर,शिवसेना माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, उदय सांगळे, नंदकुमार देसाई,शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, जगन आगळे, दिपक खुळे, सतिष नाना कुलकर्णी, शिवाजी चुंभळे, अनिल ढिकले आदी भाजपा शिवसेना युतीचे  लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.