अविश्वास ठराव स्थगित होणार मुख्यमंत्री यांचे आदेश, नाशिकमध्ये मुंढे कायम

नाशिक : करवाढ आणि इतर कारणांनी नाशिक सत्ताधारी भाजपा आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मध्ये जोरदार वाद सुरु होता. तर एका प्रकारे वर्चस्व कोणाचे म्हणून देखील दोघेही मागे हटत नव्हते. मात्र जेव्हा मुंढे यांच्या विरुद्ध जेव्हा अविश्वास प्रस्ताव भाजपाने आणला आणि भाजपा टीकेचा धनी झाले. या प्रकरणी नागरिकांनी सोशल मीडियामध्ये मुंढे समर्थन म्हणून जी काही आंदोलन केला आणि आज हजारो नागरिकांनी मनपा वर मोर्चा काढला. हा सर्व  प्रकार पाहून शेवटी मुख्यमंत्री यांनी मुंढे व नागरिकांच्या बाजूने कौल देत, अविश्वास प्रस्ताव स्थगित करत  मागेघ्या असा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे करवाढ देखील कमी करवून घेतली असून, मुंढेच दत्तक नाशिकचे विकास करतील असा सरळ संदेश दिला आहे. तर नाशिक भाजपामध्ये अंतर्गत वाद सुरु झाले असून, या सर्व प्रकारचा धनी कोण म्हणून आता आरोप सुरु झाले आहे. तर महापौर  रंजना भानसी यांनी घोषणा केली असून अविश्वास रद्द केला आहे.we want mundhe people agitation against BJP today nashik news

नाशिक महापालिकेवर नागरिकांचा मोर्चा, हजारो नागरिक सहभागी

महासभेच्या पार्श्वभूमीवर मुंढेंसारखा अधिकारी नाशकातच रहावा यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मुंढे समर्थक नागरिकांनी शुक्रवारी(दि.३१) रॅलीद्वारे समर्थन दर्शवले आहे.शहरात मागील काही दिवसांपासून अविश्वासाच्या ठरावाची चर्चा होत होती. तेव्हा मिडीयावर त्यांचे समर्थक व विरोधकांमध्ये सोशल वॉर पहायला मिळाला आहे. तर जनमत संग्रहसाठी नागरिकांची लेखी मतेही गोळा केली आहेत. एक सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या  महासभेच्या पार्श्वभूमीवर गोंधळ होण्याची शक्यता असल्याने पोलीसांनी या ‘वॉक फॉर कमिशनर’ला परवानगी नाकारली. मात्र गुरुवारी रात्री उशिरा रॅलीला परवानगी मिळाली होती.we want mundhe people agitation against BJP today nashik news

येथे पहा व्हिडियो: आमचे फेसबुक पेज लाईक करा >

Walk For Commissioner #WeWantMundhe

Nashik On Web இடுகையிட்ட தேதி: வியாழன், 30 ஆகஸ்ட், 2018

उपक्रम सुरु केला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज मुंढे समर्थक नाशिककरांनी ‘वॉक फॉर कमिशनर’ हा नारा तर दिलाच सोबतच मोर्चा देखील काढला आहे. गोल्फ क्लब येथुन सकाळी १० वाजता मोर्चा सुरु झाला. यामध्ये ‘नो गुंडे, ओन्ली मुंढे’च्या घोषणा देत, मुंढेंना समर्थन देणारा मजकूर लिहीलेले फलक हातात घेत हजारो नाशिककर सहभागी झाले.we want mundhe people agitation against BJP today nashik news

सचिन गंगाराम पानमंद यांच्या सह दिव्यांग बांधवांनी देखील मुंढे यांच्या समर्थन देत मोर्चात सहभाग नोंदवला

मनपावर हजारो नागरिक आलेले पाहून तुकाराम मुंढे स्वतः त्यांना भेटायला बाहेर आले, आपण सर्वांनी जे प्रेम दिले त्याबद्दल मी आभारी असून, शहराचा आपण सर्वांनी विकास करायचा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सोबत काम करायचे आहे असे त्यांनी मत मांडले व शांततेच्या मार्गाने मोर्चा विसर्जित करा असे आवाहन केले. we want mundhe people agitation against BJP today nashik news

मुंढे यांना समर्थन पहा येथे फोटो फिचर :

नाशिक महापालिकेवर नागरिकांचा मोर्चा, हजारो नागरिक सहभागी

we want mundhe people agitation against BJP today nashik news
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.