बहुउद्येशीय ग्राहक जागरण प्रबोधिनीकडून खडकमाळेगाव वस्ती शाळेस आर.ओ. फिल्टर भेट

 नाशिक बहुउद्येशीय ग्राहक जागरण प्रबोधिनी नाशिक या संस्थेकडून विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी खडकमाळेगाव (ता.निफाड) रायते वस्ती वसेवाडी येथील वस्ती शाळेस  आर.ओ. फिल्टर  भेट देण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, संस्थेचे अध्यक्ष संपतराव गाडे, कार्यकारी सदस्य महेंद्र गाडे, संस्थेचे उपाध्यक्ष मेजर, लक्ष्मणराव कुलकर्णी, सचिव माधव रायते, कार्यकारी सदस्य दिलीप गवळी, दुर्गानाथ गावंडे, महावीर शहा, दत्ताकाका रायते, तेजल रायते, सरपंच मोतीराम रायते, चेअरमन राजेंद्र रायते, उप.सरपंच बापू पा.राजोळे, बाजारे पोलीस पाटील, ह.भ.प.निवृती महाराज रायते, भागवानगीर बाबा आदी उपस्थित होते.

यावेळी बहुउद्येशीय ग्राहक जागरण प्रबोधिनी नाशिक संस्थेचे अध्यक्ष संपतराव गाडे यांनी उपस्थितांना ग्राहक संरक्षणा विषयी मार्गदर्शन केले. त्यात ग्राहकांनी कुठलीही सेवा,वस्तू खरेदी करताना कुठल्या दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्ठीने  ज्ञानात भर पडेल अशा अत्याधुनिक सोईसुवीधा येथील ग्रामस्थांच्या मदतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. याबाबत संस्थेकडून येथील कर्मचारी व स्थानिक नागरिकांचा सत्कार करून शाळेची पाहणी केली. सदर यशस्वितेसाठी माधव रायते व स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी आभारप्रदर्शन मुख्याध्याक देवडे सर यांनी केले.    

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.