नाशिक :वणी कोकणगाव येथे एकाच घरातील तिघांची हत्या केल्याची घटना उघड झाले होते. आई,वडील आणि मुलाला कुऱ्हाडीचे वार करून हत्या केली गेली होती.पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु होता. नाशिक दिंडोरी येथील कोकणगाव येथे हा प्रकार घडला आहे. आधि चोरी किवा पूर्ववैमनस्य असे वाटणारा हा प्रकार धक्कदायक निघाला आहे. या प्रकरणात एक मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. घरातील मोठ्या मुलानेच आई,बाप आणि लहान भावाचा खून केला आहे.पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, कोकणगाव येथील एका परिवारातील वडील जगन मुरलीधर शेळके (४५ ), आई शोभा जगन शेळके(४२) व लहान भाऊ हर्षद जगन शेळके (२०) असे खून झाले त्यांची नावे आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात एक टोळके शेळके यांच्या घरी घुसले आणि त्यांनी कुऱ्हाडीने वार करत तिघांचा जीव घेतला असा होता. मात्र पोलिसांनी सर्व बाजूंनी आपला तपासा सुरु ठेवला होता. यामध्ये तपासा करत असताना गुन्हा जिथे घडला त्या ठिकाणी अतिशय बारकाईने पाहणी आणि तपासा केला. सोबतच गुन्हा करण्याची पद्धत आणि गुन्हा करत असताना वापरलेले हत्यार याबाबत सविस्तर आराखडा तयार केला.त्यानंतर मारेकरी याचा शोध दिंडोरी आणि वणी परिसरात शोध सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना संशयित सोमनात जगन शेळके याला विश्वासात घेतले. त्याचे हावभाव आणि संशयित हालचाली यावर लक्ष ठेवले होते. तर त्याची कसून तपासणी केली. त्यावेळी त्याने स्वतःच आई,वडील आणि लहान भावाचा खून केल्याची कबुली दिली आहे. सोमनाथ हा घरातील मोठा मुलगा आहे.त्याला त्याचे वडील शेती कामावरून नेहमी त्रास देत असत.मात्र त्याचा लहान भाऊ काहीही काम करत नव्हता त्याला काहीच बोलत नाही असे सोमनाथ म्हणाला आहे.तर त्यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. तर बाहेरील अनैतिक सबंध आहेत असे त्यांच्यात अनेकदा वाद होत होते.
घटना घडली त्या दिवशी ३० मे रोजी लहान भाऊ हर्षद याचे अनैतिक सबंधावरून आरोपी सोमनाथ आई वडील यांचे जोरदार भांडण झाले होते. यावेळी वडिलांनी सोमनाथला तू सुद्धा भावा प्रमाणे वागतो दारू पितो अनैतिक सबंध आहेत असे बोलत शिवीगाळ केली होती. घरात जोरदार भांडण झाले होते, या भांडणाचा राग येवून सोमनाथ याने घरात पडलेली ट्रॅक्टरची ट्रॉपलीग हातात घेवून आई,वडील आणि लहान भाऊ यांच्या डोक्यावर वार करत निघृत हत्या केली आहे.या आधि सुद्धा आरोपी सोमनाथ ने २०१३ मध्ये शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांद्या छाटल्या त्या कारणाने वडील रागावले म्हणून विष पिले होते. सदर बाबतीत वणी पोलिस स्टेशन येथे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.