वॉक वुईथ कमिशनर’ कार्यक्रम आयुक्ताच्या खासगी कारणाने आजसाठी स्थगित, प्राप्त तक्रारींवर कारवाई होणार

आजचा स्थगित कार्यक्रम पुढील शनिवारी walk with commissioner nashik postponed today tukaram mundhe

नाशिक : नागरिकांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक वुईथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात आजपासून होणार होती. कार्यक्रम नियोजित वेळी सुरु सुद्धा झाला मात्र आयुक्त मुंढे यांच्या आईंची प्रकृति बिघडल्याने कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. मनपा आयुक्त  मुंढे यांनी दोन मिनिटे उपक्रमस्थळी हजेरी लावली, हा कार्यक्रम दिनांक  २८ रोजी  शनिवारी होणार असे जाहीर करत दिलगिरी व्यक्त केली.walk with commissioner nashik postponed today tukaram mundhe

उपक्रमांतर्गत ६० पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त तक्रारींची दखल आजच घेतली जाणारा असून त्या सोडवल्या जाणार आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे (शहर) यांनी दिली आहे.

नाशिकमधील आघडीच्या वेब न्यूज पोर्टलवर जाहिरात करा ! बातमीतील क्रमांक , ईमेलने संपर्क करा, लाखो नागरिकांपर्यंत पोहोचा !

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहे. शहरातील स्वच्छते आधी त्यांनी पहिल्याच दिवशी महापालिका आणि इतर निगडीत कार्यालये स्वच्छ करवून घेतली आहे. वेळेवर कार्यालयात नसलेल्या कर्मचारी वर्गावर कारवाई करत अनेकांना नोटीसा आणि निलंबन केले आहे. तर प्रत्येक विभागातील कामगिरी तपासली जात असून अनियमितता दिसली तर कारणे दाखवा नोटीस दिले जाते, समाधान कारक उत्तर आले नाही तर निलंबन करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग चांगलाच कामाला लागला आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईत राबविलेली ‘वॉक वुईथ कमिशनर’ ही त्यांचीच संकल्पना नाशिकमध्येही राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी सकाळी ६.५० वाजता गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्याची तयारी करण्यात आली होती. तक्रारदार नागरिकांना टोकन दिले जात होते. यावेळी सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांना टोकन देण्याची तयारी सुरू असतानाच तुकाराम मुंढे यांचे आगमन झाले आणि त्यांनी व्यासपीठावर येऊन आपल्या मातोश्रींची प्रकृति अचानक बिघडल्याची माहिती उपस्थितांना दिली आणि आजचा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढील शनिवारी घेण्याचे जाहीर केले आहे.

Connect with Us on Whats App, For Advertise with Us  :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.