ylliX - Online Advertising Network

आज युवा दिनी नव्या पिढीतील उद्योजकांशी मुक्तसंवाद

राष्ट्रीय युवा दिन : आपला विकास आपल्या हाती, हक्क तर हवेतच पण कर्तव्य आधी!

नाशिक : राष्ट्रीय युवा दिनी विवेक वाहिनीच्या वतीने विवेक युवाविचार व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रथमच होणाऱ्या या व्याख्यानमाले दरम्यान मुक्त परिसंवादात बिव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन विलास शिंदे व इएसडीएस सोल्युशन प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक पियुष सोमाणी सहभागी होणार आहेत. यांच्याशी नाशिककर युवकांना मुक्त संवाद साधता येणार आहे.

‘स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत, संधी व आव्हाने’ या विषयावर हा परिसंवाद संपन्न होईल. या व्याख्यानमालेचे उदघाटन व शुभारंभ आज युवा दिनी (दि.१२) दुपारी ३.३० वा आय.एम.आर.टी महाविदयलाय, गंगापूर रोड नाशिक येथे होणार आहे. Vivek Vahini National Youth Day free dialogue new generation entrepreneurs

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, आनंद ऍग्रो ग्रुपचे चेअरमन उद्धव आहिरे यांसह विविध मान्यवर उपस्थित असणार आहेत.

देशाची सध्य स्थिती, ग्रामविकास, रोजगार व संधी, माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांचा उहापोह या परिसंवादात होईल. सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे या स्वामी विवेकानंदांच्या वैचारिक संदर्भानेमान्यवर तरुणांना मार्गदर्शन करतील.

नाशिककरांनी मोठ्या संख्येनेउपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रम समन्वयक मुकुंद पिंगळे, सुरेश नखाते, स्वप्नील सोनवणे व प्रीतिष कारे यांनी केले आहे.

नाशिकमधून अधिकची माहिती मिळवण्याकरिता आमचे (NashikOnWeb) फेसबुक पेज लाईक करा. https://www.facebook.com/NashikOnWeb/

Vivek Vahini National Youth Day free dialogue new generation entrepreneurs

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.