ylliX - Online Advertising Network

विधानपरिषद शिक्षक निवडणूक : सेना पुरस्कृत दराडेंची आघाडी

नाशिक:  विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात 38584 मतपत्रिकांच्या कलानुसार शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी 13977 प्रथम पसंतीची मते मिळवत आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे दराडे समर्थकांनी जल्लोषास सुरुवात देखील केली आहे. Vidhan Parishad teacher election Nashik Division Shivsena Darade lead

पहिल्या फेरीत किशोर दराडे यांनी चार हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवली होती. तीच आघाडी टिकवत ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संदीप बेडसे (8232 मते) यांच्यापेक्षा जवळपास 5900 प्रथम पसंतीच्या मतांची आघाडी मिळवली आहे.

अजूनही मतमोजणी सुरूच असून अधिकृत अंतिम निकाल येण्यास उशीर होणार आहे. या निवडणूकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय महसुल आयुक्त राजाराम माने यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरु आहे. Vidhan Parishad teacher election Nashik Division Shivsena Darade lead

अशी आहे सध्याची आकडेवारी :

एकूण मतमोजणी 38584
अवैध मते 1341
नोटा 75

प्रथम पसंतीची मते
किशोर दराडे 13977 (शिवसेना पुरस्कृत)
संदीप बेंडसे 8232 (राष्ट्रवादी पुरस्कृत)
अनिकेत पाटील 4792 (भाजपा)
भाऊसाहेब कचरे 4753 (टीडीएफ)
आप्पासाहेब शिंदे 2982
प्रतापदादा सोनवणे 534 (भाजपा बंडखोर)
सुनील पंडित 288

सायंकाळी सहा वाजता पूर्ण झालेल्या दुसऱ्या फेरीअखेर शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना सुमारे 13977, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संदीप बेडसे यांना 8232 तर भाजपच्या अनिकेत पाटील यांना 4792 तर टीडीएफ म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या भाऊसाहेब कचरे यांना 4752 मते मिळाली होती. Vidhan Parishad teacher election Nashik Division Shivsena Darade lead

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या शिक्षक मतदारसंघात एकूण 16 उमेदवारांनी निवडणूक लढवली. नाशिक शहरातील अंबड येथील अन्न महामंडळाच्या गुदामात मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीसाठी वीस टेबल लावण्यात आले होते. एका टेबल वर एकावेळी 1000 मतपत्रिकांचा कौल घेण्यात आला.

दरम्यान, शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घेतल्याची पोस्ट मतदानाच्या दिवशी पसरल्यामुळे वाद होऊन प्रकरण हनामारीपर्यंत गेले होते. आता मात्र दराडे यांनी आघाडी घेतल्यामुळे ते विजयी झाले असल्याची पोस्ट मात्र आता व्हाट्सऍपवर पसरली आहे. अशी कोणतीही अधिकृत घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी यांनी केलेली नाही.

Vidhan Parishad teacher election Nashik Division Shivsena Darade lead
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.