नाशिक : एका बाजूला एका आठड्यात चार खुनाच्या घटना समोर असतांना, आता गोळीबार करत लुट झाल्याची घटना समोर आली आहे. एका भाजीपाला विक्री व्यावसायिकाला पायावर गोळी मारत पंचवटी परिसारत लुटले आहे. त्यामुळे परिसारत नागरिक दहशतीखाली आहेत.
सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथून महेशकुमार राधेश्याम अग्रहरी ( वय ३९) रा तुलसीशाम सोसायटी, पेठफाटा हे व्यापारी पंचवटी एक्स्प्रेस ने मुंबई येथे गेले होते. तेथील वाशी मार्केट येथे भाजीपाल्याच्या वसुली करत त्यांनी दोन लाख रुपये सोबत घेतले आणि रात्री पुन्हा पंचवटी ने नाशिकला परत आले होते. निमाणी येथे बस मधून उतरून त्यांनी रस्त्याने पायी भक्तिधाम परिसरात असणाऱ्या आपल्या राहत्या घराच्या इमारतीच्या बाहेर आले असता.
याठिकाणी दबा धरून बसलेल्या चार ते पाच संशयितांपैकी दोघांनी अग्रहरी याना मारायला केली आणि त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. तरी हातातील रुपयांची पिशवी मिळत नाही हे पाहता यातील एकाने गावठी कट्ट्यातून त्यांच्या पायावर गोळी घातली. यात ते व्यापारी जखमी झाली त्यात या टोळक्याने ही दोन लाख रुपयांची पिशवी घेत पलायन केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गोळीबार करण्यात आलेल्या काडतुसाची रिकामी पुंगळी ताब्यात घेतली आहे. घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्रहरी यांच्या पायातून काढलेली गावठी कट्ट्यातील गोळी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.