‘वात्सल्य’ आधाराश्रमातून बांगलादेशी दोन मुली पळाल्या

नाशिक : नाशिक शहरातील महिलांच्या ‘वात्सल्य’ या आधाराश्रमातून दोन मुली पळून गेल्या आहेत. सदरचे आधाराश्रम पोलीस आयुक्तालयासमोर आहे. या मुलींमध्ये कुंटनखान्यातून पळून आलेल्या असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू असलेल्या बांगलादेशी मुलीचा यात समावेश आहे. या प्रकरणाकडे आश्रम अधीक्षक माहिती देत नाही. त्यामुळे यासंपूर्ण प्रकरणावर अधिकच संशय व्यक्त केला जात आहे.vatsalya aadharashram bangladeshi girls run away today nashik 

रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास या मुली आधाराश्रमातून पळून गेल्या. या ठिकाणी महिला पोलिसांची सुरक्षा असतानाही हा प्रकार घडला. त्यानंतर याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फक्त हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पळून गेलेल्या मुलींमध्ये एक नाशिक जिल्ह्यातील आहे. तर दुसरी बांगलादेशी आहे. दोघींचे वय १९ आहे. सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील मोठ्या सेक्स रॅकेटमध्ये अडकल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुलगी मोठ्या धाडसाने तेथून पळून आली होती. त्यामुळे सिन्नर सेक्स रॅकेट प्रकरणावर संशय व्यक्त केला  जात आहे. मुसळगाव येथील कुंटणखाण्यातील मुलगीच पाळल्यामुळे सिन्नर सेक्स रकेटमधील संशयितांना  वाचविण्यासाठी तर हे कृत्य केले केले नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.  या मुलीने मुसळगाव सेक्स रॅकेटची पोलखोल केली होती. याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवी तस्करीचे रॅकेट समोर आले होते.

(बातमीचा फोटो फक्त विषयानुरूप घेतला आहे. )

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.