ylliX - Online Advertising Network

नामकोत वसंत गीते, हेमंत धात्रक यांच्या प्रगती पॅनलनची  एकहाती सत्ता, जिंकल्या सर्व २१ जागा

विरोधी दोन पॅनल एकही जागा जिंकता आली नाही

नाशिक : व्यापारी वर्गातील सर्वात  प्रतिष्ठा असलेल्या नाशिक मर्चन्टस्‌ सहकारी (नामको) बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार वसंत गिते, सोहनलाल भंडारी, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने एकहाती सत्ता मिळवली असून, सर्व २१ जागा त्यांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे  विरोधी असलेल्या  सहकार आणि नम्रता या दोन्ही पॅनलला एकही जागा निवडून आली आणि त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

Bank !
Bank Web Page Screen Shot !

नामको बँकेचे पावणे दोन लाख मतदार आहेत. या बॅँकेच्या निवडणुकीत आजवर कै. हुकूमचंद बागमार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलची सत्ता होती. त्याच संचालकांनी सोहनलाल भंडारी, वसंत गिते यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढविली आहे.  तर दुसरीकडे सहकारी पॅनल मध्ये ललित मोदी, अजय ब्रह्मेचा , गजानन शेलार यांनी लढत दिली आहे. तुलनेत (कै.) हुकूमचंद बागमार यांचे सुपुत्र असलेल्या अजित बागमार यांना फारसा प्रभाव दाखवता आला नाही.

आमच्या सोबत जाहिरात करा, रोजचे हजरो मोबाईल वाचक असलेल्या आमच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत तुमची उत्पादने पोहोचवा : संपर्क E-mail- nashikonweb.news@gmail.com,संपर्क : +91 9689754878, +91 88304 86650

नवीन नाशिक येथील राजे संभाजी स्टेडियम येथे गुरुवारी दि. २७ झालेल्या मतमोजणीअंती प्रगती पॅनलचे वर्चस्व सिध्द करत सर्व जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत २१ जागांसाठी ८२ उमेदवार रिंगणात होते. हेमंत हरिभाऊ धात्रक, गणेश बबन गिते, वसंत निवृत्ती गिते, सोहनलाल मोहनलाल भंडारी, महेंद्र मूळचंद बुरड, शिवदास मोहनलाल डागा, प्रकाश मोतीलाल दायमा, संतोष मांगीलाल धाडीवाल, अविनाश मूळचंद गोठी, कांतीलाल भागचंद जैन, हरिष बाबुलाल लोढा, सुभाष चंपालाल नहार, नरेंद्र हिरामण पवार, प्रफुल्ल बुधमल संचेती, विजय राजाराम साने, अशोक श्रावण सोनजे आणि रंजन पुंजाराम ठाकरे, महिला गटात प्रगती पॅनलच्या रजनी जयप्रकाश जातेगावकर आणि शोभा जयप्रकाश छाजेड आणि अनुसूचित जाती जमाती गटातील एकमेव जागेवर प्रगती पॅनलचे उमेदवार प्रशांत अशोक दिवे  यांनी विजय संपादन केला आहे.

नाशिकच्या महत्वाच्या घटना अधोरेखित करणारे, बातम्या देणारे न्यूज पोर्टल nashikonweb चे फेसबुक पेज तुम्ही लाईक केले नसेल तर नक्की करा , मिळवा बातमी तुमच्या मोबाईलवर आमचे पेज व बातमी नक्की शेअर करा : पुढील लिंक क्लिक करा !

https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.