नातेवाईकांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी जाणार्या मुलींना रस्त्यात अडवून त्यांचा विनयभंग करणार्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेने शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कोयताधारी टोळक्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून नातेवाईकांना मारहाण केल्याचा प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या (upnagar Police Stations) हद्दीत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही नातेवाईकांसोबत उपनगर नाका येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी तीन मोटारसायकलींवरून जात होती. त्यावेळी आरोपी राकेश कागडा (वय 35), सचिन कागडा (वय 30) व विनय सौदे (वय 21, सर्व रा. महाराष्ट्र हायस्कूलजवळ, उपनगर) हे त्यांच्याकडील एमएच 15-2143 या क्रमांकाच्या अॅक्टिव्हा गाडीने आले.आरोपींनी फिर्यादीच्या मुलींना अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की करून त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना मारहाण करून मुलींचा विनयभंग केला, तसेच मारहाण केली.upnagar Police Station
यावेळी पिडीतेकडे व पिडीतेच्या मुलीकडे बघून अश्लील हावभाव करून त्यांचा भर रस्त्यात विनयभंग केला. याचा विरोध केला असता त्यांनी पुन्हा शिवीगाळ केली, त्यांना धक्काबुक्की केली. सोबत असललेल्या नातेवाईकांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. गाडीतून कोयता काढत धाक दाखवला व परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पिडीतेने उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनुसार या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे.
दरम्यान, नाशिक शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून दिवसा-ढवळ्या गुन्हे घडत आहेत. यावरून या टोळक्यांना पोलिसांचा धाक नसल्याचे स्पष्ट होते. गुन्हेगारी वाढत असून नागरिक आता दहशतीत जगत आहेत. यावर पोलिसांनी गंभीर दखल घेत कडक उपयोजना कराव्यात आता अशी मागणी करण्यात येत आहे.upnagar Police Station