ylliX - Online Advertising Network

पर्यटन विकासातून  जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना मिळेल :  चंद्रकांत पाटील

सर्वसमावेशक वेबसाईट अनरँवलनाशिक डॉट कॉम चे उद्धाटन
नाशिक : 
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आनंद मिळावा, जेणेकरून जिल्ह्याची अर्थव्यवस्था गतिमान होईल याकरीता नाशिक जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी महत्वाचा टप्पा ठरेल अशा सर्वसमावेशक पोर्टल http://www.unravelnashik.com [ अनरँवलनाशिक डॉट कॉम] या वेबसाईटचा उपयोग होईल असे  मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते या पोर्टलच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. unravel nashik tourism portal launch by chndrkant patil nashik news

नाशिकचे जिल्हाधिकारी बी . राधाकृष्णन यांच्या संकल्पनेतून व जिल्हा प्रशासन व जिल्हा नियोजन समिती यांच्या  सहकार्याने या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निसर्ग,आध्यात्मिक ,ऐतिहासिक, कृषी,  व पौराणिक वारसा असलेली स्थळे , साहसी पर्यटन स्थळे ,संस्कृती ,वाईन,वेलनेस तसेच खाद्य संस्कृती यांचा समावेश करण्यात आला आहे .unravel nashik tourism portal launch by chndrkant patil nashik news
एखाद्या पर्यटन स्थालाला पर्यटकांच जाण येण वाढल की, तेथील पायाभूत सुविधाही वाढतात. व त्यामुळे समग्र विकास होण्यास मदत होते असे सांगत वेबसाईट सोबतच अशा विविध ठिकाणी सहलीचे आयोजन केल्यास नागरिकांना ही अनेक नव्या स्थानांची माहिती होण्यास मदत होते असेही त्यांनी सांगितले.  unravel nashik tourism portal launch by chndrkant patil nashik news
नाशिक जिल्हा आणि राज्याच्या दृष्टीने हा अतिशय आगळावेगळा असा उपक्रम असून देशातली ही पहिलीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त अशी जिल्ह्याच्या पर्यटनाशी संबंधित अशी वेबसाईट आहे. यातून नाशिक जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. साधुसंतांच्या मते हा साक्षात स्वर्ग आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी येथे मोठ्या संधी आहेत. जिल्ह्याला चांगले आणि दूरदर्शी अधिकारी मिळाल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळते असेही त्यांनी नमूद केले. सप्तश्रृंगी गडावरील ट्रालीच्या सुविधेनंतर ब्रम्हगिरीवर लवकरच रोप वेचे निर्माण होणार असून त्र्यंबकश्रेर च्या विकासासाठी मोठा निधी मिळणार  असल्याचे  महाजन यांनी सांगितले.unravel nashik tourism portal launch by chndrkant patil nashik news
” नाशिक ही हेल्थ सिटी व्हावी या करता प्रयत्न असून येत्या २७ जानेवारी रोजी नाशिकमध्ये हाफ ट्रायथलॉन चे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त सिंघल यांनी केली.  यामध्ये २ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी रनिंग याचा समावेश असेल. या निमित्ताने नाशिकमध्ये देश विदेशातून अनेक पर्यटक येतील असेही त्यांनी  सांगितले.
 
गेल्या एक वर्षापासून केलेल्या मेहनतीनंतर ही वेबसाईट बनवण्यात आली आहे. यामुळे होणाऱ्या पर्यटन वृद्धीतून  रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून सर्व बाबीने समृद्ध असलेल्या नाशिकची समग्र पर्यटन माहिती यानिमित्ताने जगभरात उपलब्ध झाली आहे. हा उपक्रम अजून प्रभावी करण्यासाठी पर्यटन क्षेत्रात कार्यरत काही आघाडीच्या संस्थांची मदत घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यानी सांगितले.

unravel nashik tourism portal launch by chndrkant patil nashik news

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.