ylliX - Online Advertising Network

Unlocking Nashik City Corona जिल्हाधिकाऱ्यांचा नाशिकरांना इशारा; गर्दी कराल तर पुन्हा निर्बंध

नाशिक : लाॅकडाऊन पाचमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत अटीशर्तीसह बाजारपेठा खुल्या करत सम विषम फॉर्म्युल्यासह काहीअंशी सूट देण्यात अ‍ाली आहे. मात्र, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत नाशिककरांनी दिवाळीसारखी खरेदीसाठी यावे अशी गर्दी बाजारपेठेत केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला ‌आहे. ते बघता जिल्हाधिकार्‍यांनी दिलेली सूट मागे घेऊन पुन्हा निर्बंध लावले जातील, असा इशारा दिला आहे. Unlocking Nashik City Corona

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘ ‘मिशन बिगिन अगेन’ अशी घोषणा करत महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी अटीशर्तींसह बाजारपेठा खुल्या करण्यास परवानगी दिली होती. त्यानूसार महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरातील व्यापारी संघटना व पदाधिकार्‍यांची बैठक घेत दुकाने व बाजारपेठा सुरु करण्यासाठी नियमावली तयार केली.

सम विषम फाॅर्म्युलानूसार शहरातील दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे अर्थचक्र पुन्हा गतिमान करणे हा उद्देश होता.

मात्र, शालिमार, भद्रकाली, सराफा बाजार, दूध बाजार, रविवार कारंजा या शहरातील मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. दुकानदारांकडून देखील सम विषम फाॅर्म्युलाबाबत गोंधळ पहायला मिळाला. नागरिकांकडून सोशल डिस्टन्स नियमाची पायमल्ली झाली.

या सर्व प्रकारामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपुर्वी शहरात ६१ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. गर्दी नियंत्रणात आली नाही तर पुन्हा करोनाचा विस्फोट होऊ शकतो. ही भिती लक्षात घेता जिल्हाधिकारी मांढरे यांनी बाजारपेठा सुरु करण्याबाबत दिलेल्या सवलती मागे घेऊन पुन्हा निर्बंध लादले जातील असा इशारा दिला आहे.

बाजारपेठेत गर्दी होत असून यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दुकानदारांकडून सम विषमचा नियोजनानूसार अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. नवीन फाॅर्म्युल्याबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहे. गर्दी नियंत्रण न झाल्यास पुन्हा निर्बंध लादले जातील, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. Unlocking Nashik City Corona

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.