नाशिक महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार आजपासून अनधिकृत धार्मिक स्थळ काढण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला सुजाण नाशिककरांनी कोणताही विरोध केला नाही. शहरातील सर्व व्यवहार सुरु असून महापालिका ही स्थळे काढत आहे. याची सुरुवात सिडको विभागातून करण्यात आली आहे. या मध्ये ५ धार्मिक स्थळे काढण्यात आली आहेत. पोलिस बंदोबस्तात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विधीवत पूजा करुनच धार्मिक स्थळ काढण्यात येत आहेत. महापालिकेच्या या कारवाईविरोधात मठ मंदिर बचाव समितीच्यावतीने आज नाशिक बंदची हाक देण्यात आली असून मेनरोडसह शहरातील बाजारपेठ परिसरात बंदला अल्प प्रतिसाद आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका !
सोशल मिडीयावर काही लोक हेतुपूर्वक धार्मिक /प्रार्थना स्थळे १३ \११\१०१७ रोजी स्थगिती दिली आहे अशी महिती प्रसारित करीत आहेत. परंतु अशा प्रकारचे कोणतेही धार्मिक स्थळांना न्यायलयाने आदेश दिले नाहीत.त्यामुळे महापालिकेतर्फे ८ /११/२०१७ रोजी पासून धार्मिक / प्रार्थना स्थळे निष्कासन कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशाने करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करण्यात येत आहे.जर असे कोणी केले तर पोलिस कारवाई करणार आहेत.

अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत होणाऱ्या कारवाईविरोधी हिंदुत्ववादी संघटनांमार्फत नाशिक बंदची हाक दिली आहे. तर दुसरीकडे महापालिका आणि पोलीस पूर्ण तयार आहेत. रस्त्यांवर अडथळा असलेल्या १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध बुधवार (दि. ८) पासून कारवाईची करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रथम सिडको , सातपूरमधील रस्त्यांवर अडथळा ठरणाºया धार्मिक स्थळांविरुद्ध बुधवारी कारवाई केली जाणार आहे.अशी कारवाई करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेला अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करणार आहे. महापालिकेने सन २००९ पूर्वीच्या १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस बंदोबस्तात बुधवार (दि. ८) पासून मोहीम राबविण्यात येणार आहे.

सिडकोतील आठ धार्मिक स्थळांऐवजी दोन धार्मिक स्थळे खुल्या जागांमधील असल्याने सहा धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, तर सातपूर विभागातील नऊ धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने मोहिमेची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी अतिक्रमण विभागाचे ३० कर्मचारी तैनात केले जाणार असून, सहाही विभागीय अधिकाऱ्याना प्राधिकृत करण्यात आले आहे. याशिवाय, नगररचना आणि बांधकाम विभागाचेही अभियंते उपस्थित राहणार आहेत.
- धार्मिक स्थळ हटविण्यापूर्वी पुरोहितामार्फत विधिवत पूजा केली जाणार आहे.
- मूर्ती सहजतेने हटविण्यासाठी ड्रील मशीनचा वापर
- मोहिमेची सुरुवात सिडको आणि सातपूर विभागातून
- डेब्रीज उचलण्यासाठी बांधकाम विभागामार्फत डम्परची व्यवस्था
- दोन जेसीबी
- मोहिमेचे व्हिडीओ चित्रीकरणासह छायाचित्रण
- मोहिमेप्रसंगी कुणी पुरावे सादर केल्यास नगररचना विभागाच्या अभिप्रायानंतर कारवाईबाबत पुनर्विचार होऊ शकतो
- पहिल्या टप्प्यात सन २००९ नंतरच्या १०५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केलेली आहे.
( सर्व छायाचित्र सिटीझन जर्नालीस्ट मयूर जगताप यांनी पाठवले आहेत. आपणही आम्हाला अशी माहिती देवू शकता आम्ही नक्की प्रसिद्ध करू )
आमचे फेसबूक पेज : https://www.facebook.com/NashikOnWeb
आज द्वारका ते थेट पांडवेलनी पर्यंत अनेक धार्मिक स्थळ आहेत जे पूर्वी ला छोट्या स्वरूपात होते आता त्याचा विस्तारत हा २००९ नंतर खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे यात द्वारका पासून ते पांडवलेणी यांचा दुतर्फी बाजूला असलेल्या दोनी सर्विस रोड चा भाग आहे….. त्या धार्मिक स्थळांचा विचार नगर पालिकेने कधीच केला नाही,
हिंदुस्थान होये हिंदुस्थानाचा प्रगती साठी नेहेमी सनातनी (हिंदू ) धर्मियांनी आपल्या जमिनी आपल्या देऊळ आपले घर यांचा बलिदान दिला आहे आणखीन किती काळ हा त्रास सोसायचा ?