ylliX - Online Advertising Network

गुगलने टाकला तुमच्या मोबाईलमध्ये आधारचा टोल-फ्री नंबर; कंपनीने केला खुलासा

UIDAI क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये असल्यास घाबरण्याचे कारण नाही

(३ ऑगस्ट ) : सगळ्या सोशल मीडियावर सध्या अनेकांच्या अँड्रॉइड फोन मध्ये UIDAI च्या नावाने क्रमांक सेव्ह असल्यास तो डिलीट करून टाका असे मेसेज फिरत आहेत, त्यात अनेक जण हा व्हायरस आहे किंवा हे हॅकर चे काम असल्याचे सांगत आहेत, त्यामुळे अफवा आणि भीती पसरत चालली आहे. पण ह्यात घाबरण्यासारखे अजिबात काही नसून ही केवळ तांत्रिक चूक आहे. UIDAI toll Free Number Google Android OS 1947

2014 मध्ये काढलेल्या काही गुगल अँड्रॉइड ओएस मध्ये गुगलनेच चुकीने हा क्रमांक घालून दिला होता अन नंतर तो तसाच वितरित झाला. गुगलने केलेल्या खुलासात याबाबतचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

आपली अँड्रॉइड ओएस गुगल कंपनी बनवते, आपल्या रेडमी,सॅमसंग इ. मोबाईल मध्ये येण्यापूर्वी गुगल ह्या मोबाईल निर्मात्या कंपन्यांना अँड्रॉइड ओएस पुरवते आणि नंतर ह्या कंपन्या आपल्या गरजेनुसार त्यात बदल करून मोबाईल मध्ये अँड्रॉइड ओएस इन्स्टॉल करून तो मोबाईल विकतात. UIDAI toll Free Number Google Android OS 1947

तर ह्यात झालं असं की गुगल ने 2014 साली भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड ओएस बनवताना “नजरचुकीने” UIDAI च्या नावाने हा क्रमांक त्यात आधीच सेव्ह करून दिला. अन तीच ओएस आपल्या मोबाईल निर्मात्यांनी इन्स्टॉल केली त्यामुळे हा क्रमांक आपल्या आपोआपच आपल्या संपर्क यादीत (Contact List) मध्ये सेव्ह झालेला दिसतो. ही चूक लक्षात येताच गुगल ने नंतर च्या व्हर्जन मधून ती दुरुस्त केली व तो क्रमांक काढून टाकला. त्यामुळे ज्यांची मोबाईल ओएस 2014 साली तयार झाली होती त्यांच्या संपर्क यादीत हा क्रमांक दिसतोय अन त्याच लोकांच्या इतर मोबाईल हा क्रमांक सिंक (sync) होऊन इतर ठिकाणी देखील दिसतो.

त्यामुळे तुमच्या मोबाईल मध्ये हा UIDAI क्रमांक दिसत असेल तर तो कुठलाही व्हायरस अथवा हॅकरचं काम नसून, गुगल कंपनीच्या चुकीने आला आहे. तो तुम्ही डिलीट करून टाकू शकता व निश्चिंत रहा, असे स्वतः गुगलनेच आज स्पष्ट केले. त्यामुळे ह्या सगळ्या वादावर पडदा पडला आहे.

हा कसलाही व्हायरस नसून, अजिबात घाबरण्याचे कारण नाही, त्यामुळे तुम्हाला आलेले ह्या संबंधीचे व्हाट्सअप्प आणि बाकी मेसेज फॉरवर्ड करणे टाळून, इतरांना घाबरण्यापासून वाचवू शकता.

आशुतोष – ज्ञानभाषामराठी-तंत्रविज्ञान

Users who find the contact number on their list can delete the number if they want to. Remember, this is not an official helpline number.

UIDAI ने आधी केलेले खुलासा इथे वाचा…

इंडियन एक्स्प्रेसची बातमी इथे देत आहोत… UIDAI toll Free Number Google Android OS 1947

Google says it ‘inadvertently’ added UIDAI helpline number in Android version given to Indian smartphone manufacturers

Hours after the Unique Identification Authority of India (UIDAI) denied that it forced any smartphone manufacturer or telecom service provider to add a helpline number into people’s contact lists, Google accepted that it had in 2014 inadvertently coded the 112 distress number and the UIDAI number into its setup wizard for Android. This in a way put to end the controversy surrounding the mysterious entry of the UIDAI number in the contact lists of many smartphone users around the country. UIDAI toll Free Number Google Android OS 1947

“Our internal review has revealed that in 2014, the then UIDAI helpline number and the 112 distress helpline number were inadvertently coded into the SetUp wizard of the Android release given to OEMs for use in India and has remained there since. Since the numbers get listed on a user’s contact list these get transferred accordingly to the contacts on any new device,” a statement from Google said.

Apologising for “any concern that this might have caused”, the statement from a Google spokesperson said it “would like to assure everyone that this is not a situation of… Read More

UIDAI toll Free Number Google Android OS 1947
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.