देशाला धमकवणारा पंतप्रधान मिळाला – उद्धव ठाकरे

 

देशाला धमकवणारा पंतप्रधान मिळाला – उद्धव ठाकरे
नाशिक : प्रतिनिधी
देशाला धमकवणारा पंतप्रधान मिळण हे दुर्दैवच आहे असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदावार आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी सामना दैनिकवर बंदीचा मुद्दा, नोटबंदी, शेतकरी कर्जमुक्ती यांसारख्या आधी अनेकदा बोललेल्या विषयांवरच नाशिककरांशी संवाद साधला. विशेष म्हणजे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विकास कामावर बोलताना जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणेन असे सांगत टीका टाळल्याचे दिसून आले.

भारतीय जनता पार्टीने अटलबिहारी वाजपेयींसारखे चांगले नेते दिले आहेत. मात्र आता तिथे गुंड येऊन बसले आहेत. हीच गुंड मंडळी जर आमच्या अंगावर येणार असतील, आमच्या माताभगिनींवर हात टाकला तर तो हात शिवसैनिक उखडून टाकू असे म्हणत शहरात वाढत्या गुन्हेगारीवर आणि भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिस स्टेशनमध्ये फोन करून गुंडांची यादी घेतली. मात्र त्यांना थेट भाजपत घेतले अस म्हणत नाशिकमध्ये भाजपने गुडांना प्रवेश दिल्याबाबत उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला.

एकीकडे भाजपवर टीका करत असतांना उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आली तर भाजपा कर्ज माफ करणार आहे. तर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्यास पाठिंबा देत राहू असेही स्पष्ट केले आहे. दोन दिवसापासून चर्चेत असलेल्या दैनिक सामनावरील बंदीबाबत बोलतांना सांगितले की सामना हे वृत्तपत्र नाही शस्त्र आहे, बंदी घालूनच बघा, आगीशी खेळू नका या शब्दात धमकी दिली. नोटबंदीमुळे देशाचे नुकसान झाले आहे. आता दोन हजाराच्या बनावट नोटा येऊ लागल्या आहेत. हा दुष्काळातला तेरावा महिना ठरल्याचे सांगितले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.