ylliX - Online Advertising Network

दुचाकी चोरांची टोळी पकडली, १५ दुचाकी जप्त

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 ने केलेल्या कारवाईत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील चार संशयितांना पकडण्यात आले आहे. सदरच्या संशयितांकडून आठ लाख १५,००० रुपयांच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. Two wheeler thief gang arrested nashik police crime branch

गेल्या काही दिवसात शहर परिसरातून पल्सर, शाईन, अ‍ॅक्टीव्हा यासारख्या गाड्या मोठ्या संख्येने चोरीला जात आहेत. या संदर्भात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३० हून अधिक वाहन चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी गुन्हेगारांचा आणि गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याबाबत गुन्हे शाखा २ ला सुचना करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित आकाश मराठे (२०) याला काठेगल्ली परिसरातून ताब्यात घेतले. Two wheeler thief gang arrested nashik police crime branch

त्याची चौकशी केली असता त्याने नाशिक शहर तसेच धुळे, शिरपुर आणि चाळीसगांव या परिसरातून संशयित उमेश उर्फ पप्पु मोरे, शरद बुवा, राहुल वाघ यांच्या मदतीने १५ दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले.

पोलीसांनी चारही संशयितांकडून १५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. त्याचे अंदाजे किंमत आठ लाख १५ हजार रुपये आहे.

दरम्यान या टोळीतील मुख्य सुत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिली.

Find Other News Stories with Key : Nashik City Police

Two wheeler thief gang arrested nashik police crime branch
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.