सप्तश्रृंगीमातेच्या दर्शनासाठी औरंगाबाद येथून आलेल्या तरूणाने दुचाकीसह शितकड्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. या घटनेत दुचाकी पूर्णपणे मोडली असून तरूणाचा मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. या घटनेची माहिती येथे काम करणाऱ्या कामगारांनी पोलिसांना कळवली. (Two Wheeler Suicide)

मृत तरूणाचे नाव प्रशांत जयवतंराव मोरे (३०, राहणार, अभिनंदन सोसायटी, विटखेडा रोड, ओरंगाबाद) असे आहे. तर दुचाकी क्र एम.एच.२० सी एम ५०८६ असा आहे. ही आत्महत्या चार ते पाच दिवसांपूर्वीच केली असून मृतदेह पूर्णपणे सडून गेला. याबाबत अधिक तपास अभोणा येथील पोलीस अधिक तपास करत आहे.
हा दुर्दैवी प्रकार आत्महत्या मागच्या चार ते पाच दिवसांपूर्वीच केल्याचे प्राथमिक समोर आला आहे. या मृत तरूणाचे मामा पाळे (कळवण) येथील रहिवासी आहेत. या झालेल्या घटनेची माहिती यांना देण्यात आली आहे. जवळपास चारशे ते पाचशे फूट खोल दरीत या तरूणाचा मृतदेह चार ते पाच दिवसापासून पडलेला होता.
त्यामुळे मृतदेह पूर्णपणे सडून गेल्याने उग्र असा वास येत होता. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय कळवण येथील डॉक्टरांना झालेल्या घटनास्थळी बोलावले होते. याबाबत अधिक तपास अभोणा येथील पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एस. आय खाडे, पो. कॉ. योगेश गवळी, पो.कॉ. शिंदे आदी करत आहे.(Two Wheeler Suicide)
वाचक मित्रांनो जीवन संपवणे हे सर्व चुकीचे आहे. त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही संकटाला घाबरून जावू नका, जगात फक्त पुरुष गरोधर राहू शकत नाही इतकच अशक्य आहे. त्यामुळे कोणतेही संकट नक्की दूर करता येईल. खालील हेल्पलाईन किंवा जवळच्या डॉक्टरचा नक्कीच तुम्ही मदत घेवू शकता.
