शिकाऊ डॉक्टरांचा महिलांवरील शस्त्रक्रियेत सहभाग असल्याने मृत्यूचा आरोप
नाशिक : प्रतिनिधी : जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या तीन महिलांपैकी दोघींचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. Two female patients died nashik civil hospital
या गंभीर प्रकारात जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या नवीन शिकाऊ डॉक्टरांचा महिलांवरील शस्त्रक्रियेत सहभाग असल्यानेच ही गंभीर घटना घडल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या गंभीर प्रकरणात माधुरी अंकुश देवरे (२३, रा.चौथी स्कीम, सिडको), रोहिणी सोमनाथ भांडारे (२५, रा. शेंडी, ता. अकोला, जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे.
माधुरी देवरे यांना त्यांच्या भावाने सोमवार रोजी दि.८ रूग्णालयात प्रसुतीकरिता दाखल केले. माधुरी यांची नैसर्गिक प्रसुती होत नाही हे पाहता मंगळवारी सिझेरियनने त्यांची प्रसुती झाली. मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु केले मात्र त्यांचा मृत्यू झाला.
दुसर्या घटनेत रोहिणी सोमनाथ भांडारे यांना अकोला तालुक्यातील राजूर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची नैसर्गिक प्रसुती झाली मात्र, अर्भक पोटातच मृत झालेले होते. काही वेळातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी (ता.१०) रात्री पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अतिरक्तस्त्रावाने मृत्यू ओढावल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.