ylliX - Online Advertising Network

पंचवटी एक्स्प्रेसची एकवीस नवीन बोगी लवकरच सेवेत

नाशिक :नाशिक ते मुंबई रोज अपडाऊन करत असलेल्या प्रवासी वर्गाची आवडत्या पंचवटी एक्स्प्रेसला नवीन एकविसावी बोगी लवकरच जोडली जाणार आहे. या बोगीचे काम आता पूर्ण होत आले असून, ती लवकरच सेवेत दाखल होणार आहे. यामुळे हजारो प्रवाश्यांना मोठा फायदा होणार असून प्रवास अजून चांगला होणार आहे.

मनमाड येथून सुरुवात करत नाशिक  ते मुंबई असा  प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रु ग्ण, पर्यटक यांच्यासाठी पंचवटी एक्स्प्रेस ही रेल्वे अतिशय सोयीची आणि खूप महत्वाची आहे. या गाडीमुळे आर्थिक राजधानीत कमी रुपयात प्रवास करत योग्य वेळेत दाखल होता येते. त्यामुळे सर्वाचा कल हा सकाळी सुटणाऱ्या या गाडीकडे असतो. रेल परिषदेने प्रवासी वर्गाची गरज ओळखून याच अनुषंगाने रेल परिषद ने नवीन रेक ( संपूर्ण २१नवीनबोगी ) मिळावी. अशी मागणी रेल्वेमंत्री तसेच जनरल मॅनेजर यांच्याकडे केली होती. तर याचा पाठपुरवा देखील त्यांनी अधिकारी वर्गाकडे केला होता. चेन्नई येथे याचे काम पुर्णत्वाकडे आले आहे.

साधारण एक महिन्यात हे नवे कोच नाशिकच्या प्रवाशांना मिळण्याची शक्यता आहे. रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी व गुरमितसिंग रावल यांनी चेन्नई येथे जावून ‘पंचवटी एक्स्प्रेस’ च्या नवीन रेकच्या बांधणीची समक्ष पाहणी केली. यावेळीअभियंताएल. सी. त्रिवेदी यांनी कोच ची बांधणी दाखविली आहे. त्यामुळे आता पंचवटी एक्स्प्रेसचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार असून अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या आगोदर रेल परिषदेने आदर्श कोचच्या माध्यमातून पंचवटी एक्सप्रेसला ५ वेळा ‘लिम्का बुकआॅफ रेकोर्ड ’ मध्ये स्थान मिळवून दिले आहे. तर नाशिकची या गाडीला आदर्श रेल करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.