ylliX - Online Advertising Network

दिसण्यातील सामर्ध्यामुळे गेला तुषारचा बळी

तुषार साबळे हत्या प्रकरण : १२ संशयित ताब्यात

जेलरोड : नाशिकरोड भागातील अल्पवायीनाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी २४ तासाच्या आत १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे. याववेळी संपूर्ण तयारीनिशी हा हल्ला केल्याचे आढळून आले असून पंचवटीतील किरण निकम याच्या खुनाचा बदला म्हणून आरोपींनी एकाला संपवण्याचा कट आखला गेला. मात्र या संशयितांच्या टार्गेट नुसार चुकीच्या माणसाला मारले गेले. केवळ दिसण्याच्या सामार्ध्यामुळे कसारा येथील तुषार साबळे या तरुणाला ठार मारले. असे दिसत असले तरी असा गुन्हा करताना एवढी मोठी गल्लत होऊ शकते का याचा तपास पोलीस करत असून अजूनही काही घडले असेल तर त्यामागून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

काल घडलेली घटना अशी, अगदीच सिनेस्टाईल पद्धतीने घडलेल्या या घटनेत एक टोळके पाच सहा इमारतींच्या परिसरात चेहऱ्यावर काळे रुमाल बांधून घुसले. एकाचवेळी ३ चारचाकी (ओम्नी, अल्टो, इंडिगो) असा ताफाच त्यांचा होता. अशावेळी ते परिसरात प्रवेश करताना त्यांनी हवेत गोळीबार केला. परिसरातील नागरिकांमध्ये घाबराट पसरली होती. त्यावेळी पार्किंग परिसरात दोघे बाहेरून दुचाकीवरून घरी आले. पार्किंग परिसरात अजून दोघांसोबत बसले होते. टोळक्याने दोघांना लक्ष्य केले. त्यात तुषार हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. तुषार सोबत असलेला त्याचा भाऊ अक्षय मात्र या हल्ल्यातून थोडक्यात बचावला. हल्लेखोरांची हिम्मत म्हणजे ते अक्षयचा पाठलाग करत त्याच्या तिसर्या मजल्यावरील घरापर्यंत पोचत त्यांनी दरवाजावर लाथाबुक्क्याही मारल्या होत्या.

पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवीत तुषारचा आतेभाऊ अक्षय जाधव याच्यासह अक्षय आत्माराम अहिरे (२२, रा. महालक्ष्मी चाळ, भद्रकाली), नितीन किरण पवार (१९, रा. बजरंगवाडी), अमोल विष्णू गांगुर्डे (२६, रा. महालक्ष्मी चाळ, भद्रकाली), करण राजू लोट (२१, रा. महालक्ष्मी चाळ, भद्रकाली) आणि इतर अशा १२ संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.