ylliX - Online Advertising Network

नाशिक शहरासाठी हाती घेतलेली कामे ‘पूर्ण’ करायची इच्छा होती : तुकाराम मुंढे

बदली प्रश्नी मुंढे यांचे नो कॉमेंट्स…

नाशिक महापालिका आयुक्त म्हणून बदली झाल्याचे आदेश मिळाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी नाशिककरांचे आभार मानले आहेत. माध्यमांशी बोलताना मुंढे म्हणाले की, नाशिकला आयुक्त म्हणून कमी कालावधी मिळाला मात्र त्यात शहराच्या दृष्टीने व नाशिक स्मार्ट होणार त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. कपाट प्रश्न मार्गी लावला असून लहान रस्ते  मोठे केले आहेत. त्याबरोबर पाणी प्रश्न , कचरा व्यवस्थापन आदी प्रश्न प्रामुख्याने सोडवले असून त्याचा नक्कीच नाशिकला फायदा होणार आहे. tukaram mundhe nashik city work done nashikkars cooperation

बदलीच्या प्रश्नावर मात्र मुंढे यांनी नो कमेंट्स म्हणून बोलण्यास टाळले.

मुंढे पुढे त्यांच्या केलेल्या कामांबद्दल सांगतात की, आयुक्त म्हणून लाभलेल्या कार्यकाळात जमेल तेवढी चांगली कामे करण्याचा प्रयत्न केला. काही प्रकल्प पूर्ण झाले, तर काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही अगदीच शिशु अवस्थेत आहेत. ती कामे पूर्ण करायला मिळाली असती तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

मनपाच्या अॅपच्या माध्यमातून शहरातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून ३० हजार तक्रारींचे निवारण झाले असेही मुंढे यांनी सांगितले. tukaram mundhe nashik city work done nashikkars cooperation

प्लास्टिकपासून इंधन तयार करणे, सेप्टिक पेस्टपासून एनर्जी तयार करणे, असे अनेक प्रकल्प राबवले. शहरात २४ तास पाण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच शहरात ७ हजारांपेक्षा जास्त स्ट्रीट लाईट लावले जाणार आहेत, रस्त्यांचे ९ मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहेत.

टॅक्स रिफॉर्मच्या बाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या त्याच्या माध्यमातून नाशिक मनपाला कायमस्वरुपी उत्पन्न मिळेल. तसेच युवकांना उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध केंद्र उघडले जाणार आहेत.

‘वॉक विथ कमिशनर’ सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या भागात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविल्या. तसेच नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन कामांचे नियोजन करण्यात आले. नाशिककरांच्या सहकार्यामुळे ९ महिन्याच्या कार्यकाळात काम करतांना समाधान मिळाले, असेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

कुटुंब आणि मुलांवर परिणाम

सतत बदली होते त्याचा परिणाम मुलांवर आणि परिवारावर होतो. त्यांना नेहमीच शाळा बदलावी लागते सोबतचा नवीन मित्र देखील जोडावे लागतात त्यामुळे त्यांना त्रास होतो. बदली थोड्या कालावधीने जर झाली तर चांगले राहील त्यामुळे परिवाराला त्रास होणार नाही. सोबतच मुलांना एकाचा ठिकाणी ठेवण्याचा विचार असून त्यामुळे त्यांच्या बाल मनावर परिणाम होणार नाही आणि त्रास होणार नाही असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

tukaram mundhe nashik city work done nashikkars cooperation
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.