मुंढे इफेक्ट : पुन्हा अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरु (Photo)

कोणत्याही विभागात गय केली जाणार नाही Tukaram mundhe effect nashik nmc atikraman mohim 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अतिक्रमांवर नजर ठेवली असून, अधिउकारी वर्गाला कडक सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता महापालिका पुन्हा जागी झाली असून अतिक्रमण निर्मुलन मोहीम सुरु केली आहे.

ना.पूर्व विभागातील, सहयाद्री हॉस्पिटल येथे सार्वजनिक रस्त्यास अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या, तसेच सारडा सर्कल ते लोखंड बाजार ते दुधबाजार ते दामोदर थेटर पावेतोच्या रस्त्यावरील दोन्ही बाजुकडील अतिक्रमणे हटविण्यात येऊन सुमारे 13 ट्रक विविध साहीत्य (टप-या, हातगाडया, स्टुल, टेबल, खुर्च्या, लोखंडी साहीत्य इ.) जप्त करण्यात आले.

सातपूर विभागातील छत्रपती शिवाजी भाजी मंडई, तसेच शिवाजी मंडई पार्कींग मधील व सातपूर कमानी पासून ते मारुती मंदिरापावेतो रस्त्यावर व रस्त्यालगत अतिक्रमणे करुन बसणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते व इतर तत्सम व्यावसायिक यांची अतिक्रमणे दि. 15/02/2018 रोजी हटविण्यात येऊन संबंधीतांचे सुमारे 7 ट्रक विविध प्रकारचे साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे.

वरील कारवाई ही  आयुक्त  तुकाराम मुंढे सो, अति. आयुक्त (2) किशोर बोर्डे सो. यांचे मार्गदर्शनानूसार उपआयुक्त (अति.) आर.एम. बहिरम यांचे सूचनेप्रमाणे श्रीमती. जयश्री सोनवण (विभा.अधि. पूर्व विभाग), नितीन नेर (विभा.अधिकारी, पश्चिम विभाग), (बी.वाय. शिंगाडे, विभा.अधिकारी पंचवटी) अतिक्रमण विभागाचे 5 पथके, दैनंदीन अतिक्रमण निमुर्लन पोलीस बंदोबस्त यांचेसह उपरोक्त नमूद अतिक्रमणे/अन.बांधकामे काढण्यात आलेली आहेत.

यापूढे सहाही विभागांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करणेत येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.

तसेच शहरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या तसेच पार्कींगच्या जागांवर असलेली बेकायदेशीर व अतिक्रमीत असलेली बांधकामे काढुन घेणेबाबत यापूर्वी वेळोवेळी जाहिर आवाहनाव्दारे सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या नागरीकांनी, व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी त्यांचे अतिक्रमणे/अनधिकृत काढुन घेतलेली नाही, त्यांचेविरुध्द कडक कारवाई करणेत येईल, तेव्हा ज्यांनी-ज्यांनी असे बेकायदा बांधकामे व अतिक्रमणे केलेली आहेत. त्यांनी ती सत्वर काढून घेऊन मनपास सहकार्य करावे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.