ylliX - Online Advertising Network

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या मंगरुळ टोल नाक्यावर ट्रक पेटला

प्लास्टिक साहित्य घेवून जाणारा ट्रक पेटला

नाशिक :चांदवड येथील असलेल्या टोलनाका परिसरात आज ४ जून रोजी एका ट्रकने अचानक पेट घेतला आहे.तर मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या मंगरुळ टोल नाक्यावर ट्रकचे टायर फुटल्याने ट्रकनं पेट घेतला आहे. यात ट्रक मध्ये प्लास्टिक बनवत असलेल्या कच्चा माल  गोणी भरुन जाणारा ट्रक जळून ख़ाक झाला आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमनदालच्या गाड्यांनी ही आग विझवली आहे.

आग इतकी भीषण होती की टोलनाक्यालाही आग लागली होती . आग लागल्यानंतर तातडीनं मनमाड, ओझऱ, मालेगाव, चांदवड, पिंपळगाव भागातून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोमा टोल कंपनीच्या वतीनं आग विझवण्याचं काम सुरु आहे.या घटनेनंतर धुरामुळे मुंबई-आग्रा हायवेवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.तर आग थांबल्यावर एका लेन मधून वाहतूक सुरु केली होती.

—————————–

नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक, उत्तर महाराष्ट्र, राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती, प्रेस नोट, प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम, आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता. या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो. प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे. आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत.आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.