गुढीपाडवा : नववर्ष शोभा यात्रेतून वाहतूक नियमांचे प्रबोधन

नवीन नाशिक परिसरात नववर्ष शोभा यात्रा उत्साहात

नाशिक : नववर्षस्वागत यात्रा समिती कडून पाडाव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात आयोजित केलेली नववर्ष शोभा यात्रा पारंपारिक वाद्य, लेझीम, ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत हातात वाहतूक नियमाचे फलक घेत वाहतूक नियमांचे प्रबोधन केले.

यावेळी नाशिक सायकलीस्टच्या सायकलिस्टने सहभागी होत प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी आमदार सीमा हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेवक दीपक दातीर, प्रमुख पाहुणे संजय अग्रवाल, प्रमुख वक्ते समिर देव, अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परदेशी, संस्थेचे अध्यक्ष बाजीराव पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, सचिव राजेश मालपुरे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सदर शोभा यात्रा सकाळी ६.३० वाजता खुटवडनगर, पवननगर, उत्तमनगर  या मार्गाने येऊन सकाळी ८.३० वाजता डीजीपी नगर ठाणे जनता सहकारी बँकेसमोर माऊली लॉन्स पोहचली त्यानंतर येथे शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला.

Traffic rules propagation Nav varsha Shobha Yatra gudhi padva, गुढीपाडवा नववर्ष शोभा यात्रेतून वाहतूक नियमांचे प्रबोधन, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक मराठी बातम्या,

या शोभा यात्रेत मुकेशभाई पटेल शाळा, दत्तनगर, जनता विद्यालय चुंचाळे, आदर्श क्लास व बालवाडी, अत्रेयनंदन सामाजिक संस्था, ठाणे जनता सहकारी बँक ली. साई पेट्रोलियम कामटवाडे नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन, श्वास फाउंडेशन, योग विद्या धाम, नाशिक, टेंभी नाका मित्र मंडळ आदी संस्थासह रामराज्य ढोल पथक सहभागी झाले होते.

याप्रसंगी समीर देव यांनी हिंदू नवीन वर्ष व गुढीपाडव्या बद्दल सखोल माहिती उपस्थितांना दिली. अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन चैन स्केचीन, सुट्यामधे आपल्या घराची घ्यावयची काळजी, तसेच वाहतूक नियमांची माहिती देत सुरक्षिततेबाबत माहिती दिली.

तसेच वाहन चालवताना हॉर्नचा वापर कमी करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने स्वागत करून वाहतूक नियमांचे फलकाचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल चांदवडकर यांनी केले.

याप्रसंगी रामराज्य ढोल पथकाकडून दि. २० मार्च रोजी जागतीक चिमणी दिनाच्या निमित्त मातीच्या भांड्यांचे वाटप करून आपल्या घराच्या बाहेर चिमण्यांसाठी भांड्यात पाणी भरून ठेवावे व पक्षांना जीवदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Traffic rules propagation Nav varsha Shobha Yatra gudhi padva, गुढीपाडवा नववर्ष शोभा यात्रेतून वाहतूक नियमांचे प्रबोधन, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक मराठी बातम्या,

Traffic rules propagation Nav varsha Shobha Yatra gudhi padva
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.