ylliX - Online Advertising Network

​​गणेश विसर्जन : ​शहरात वाहतूक मार्गात बदल​; मार्गांची तपासणी पूर्ण​

Traffic Management Diversion Nashik Police Ganesh Visarjan Miravnuk 2019

नाशिक​ :​ गणेशभक्तांचा पाहूणचार​ स्वीकारून तब्बल १० दिवस मुक्काम करणाऱ्या​ बाप्पाचे ​आज ​(दि. १२) विसर्जन करण्यात येणार आहे. ​​बाप्पाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यासाठी गणेश मंडळे सज्ज झाली ​आहेत. ​​नाशकातील सर्वच विभागात वेगवेगळे मिरवणूक मार्ग असून या मार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांची तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मिरवणूक मार्गांची तपासणी पोलिसांनी केली आहे. बॉम्ब शोधक पथकानेही मार्गाची सुरक्षितता तपासली.

सकाळी १० ते मिरवणूक संपेपर्यंत​ मिरवणूक मार्गात विशिष्ट कालावधीसाठी​ बदल अमलात राहतील असे निर्देश वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले – भिंगी यांनी दिले आहेत​. ​विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे​.​ नाशिक शहरासह नाशिकरोड, गंगापूर, देवळाली​, ​जेलरोड या भागातील वाहतूकमार्गात विशिष्ट कालावधीसाठी बदल करण्यात येणार आहे.​ ​वाहतूकमार्गातील बदल पोलिस सेवेतील वाहने , रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलातील वाहने व या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी लागू राहणार नाही.

नाशिक​ शहरातील मिरवणूक मार्ग :
शहरातील मुख्य मिरवणुक ​मार्ग :

दुपारी वाकडी बारव (चौक मंडई) येथून सुरुवात होईल. जहांगीर मशीद – दादासाहेब फाळके रोड – महात्मा फुले मार्केट – बादशाही लॉज कॉर्नर – विजयानंद थिएटर गाडगे महाराज पुतळा – गो. ह. देशपांडे पथ – धुमाळ पॉइंट – सांगली बँक सिग्नल – महात्मा गांधी रोड – मेहेर सिग्नल – स्वामी विवेकानंद रोड – अशोकस्तंभ – नवीन तांबट आळी – रविवार कारंजा – होळकर पूल – मालेगाव स्टॅड – पंचवटी कारंजा मालवीय चौक – परशुरामपुरिया रोड – कपालेश्वर मंदिर – भाजी बाजार – म्हसोवा पटांगणावरून विसर्जनस्थळापर्यंत ही मिरवणूक जाईल.

शहरातील मार्गबदल ​:

बाप्पाला करा पर्यावरणपूरक बाय बाय; शहरातील नैसर्गिक विसर्जनस्थळे – कृत्रिम तलाव

​विसर्जन मिरवणुकीदरम्यान निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या शहर बस आडगाव नाक्यावरील पंचवटी डेपोतून सुटतील​.​ तसेच ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस व अन्य वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व शहरातील अन्य ठिकाणी जातील. पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल, कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाऱ्या शहर वाहतुकीच्या सर्व बस शालिमार यथून सुटतील व त्याच मार्गाने ये – जा करतील​.​

नाशिकरोडमधील मिरवणूक मार्ग ​:

​नाशिकरोडला ​बि​टको चौकातून मिरवणूक मार्गस्थ होईल. शिवाजी महाराज पुतळा – देवी चौक – रेल्वे स्टेशन पोलिस चौकी -सुभाष रोड – सत्कार पॉइंट – देवळाली गाव गांधी पुतळा – खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीपर्यंत ही मिरवणूक जाईल.

नाशिकरोडमधील मार्गबदल ​:

​पंचवटी डेपो, निमाणी बस ​स्टॅन्ड​, महामार्ग, सिडको येथून नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या राज्य परिवहन विभागाच्या बस केवळ दत्त मंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथूनच माघारी फिरतील.​ ​सिन्नरकडे जाणाऱ्या बस व अन्य वाहने उड्डाणपुलावरून ये – जा करतील.

​​जेलरोडचे मार्गबदल ​:

​नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक, तसेच सैलानीबाबा चौक ते नांदूर नाका मार्ग दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून ) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद असेल. या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने नांदूर औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील.​

देवळालीतील​ मिरवणूक​ मार्ग :​

नाशिकरोड – देवळाली ​कॅम्प​ या मार्गावरील सिलेक्शन कॉनरपासून मिरवणुकीला सुरुवात होईल. झेंडा चौक – शारदा चौक – जामा मशीद रोड – जुने बस स्टॅड – संसरी नाका – संसरी गावमार्गे दारणा नदीमध्ये श्रींचे विसर्जन करण्यात येईल. मिरवणुकीतील वाहने वगळता अन्य वाहनांना हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल.

​आनंदवल्ली – चांदशी गाव पूल (गंगापूर​ पोलीस ठाणे) :​

चांदशी​ ​गाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशीपर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. नाशिककडे येणाऱ्या व नाशिकहून चांदशीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना आनंदवली पुलाकडे न जाता चांदशी रोडने उजव्या बाजूने वळून तटकालव्यामार्गे रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोडकडे जाता येईल.​

Traffic Management Diversion Nashik Police Ganesh Visarjan Miravnuk 2019

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “​​गणेश विसर्जन : ​शहरात वाहतूक मार्गात बदल​; मार्गांची तपासणी पूर्ण​

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.