नाशिक पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी टोमॅटो लिलावाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सहा हजार क्विंटल आवक होती. दर कमाल 25 व सरासरी 21 रुपये प्रतीकिलो मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लागवड कमी झाल्याने चांगला दर मिळाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.Tomato auction
पिंपळगाव बाजार समितीत दरवर्षी 16 ऑगस्ट रोजी टोमॅटो लिलावाला प्रारंभ होतो. आज दुपारी तीनच्या सुमारास आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पिंपळगाव, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड येथील शेतकरी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी आवक सहा हजार क्विंटल आली. येथे टोमॅटोचा किमान दर 2.50, कमाल 25 व सरासरी 21 रुपये प्रति किलो पुकारला गेला. मागील वर्षी पहिल्या दिवशी येथे टोमॅटोला पंधरा ते साडेसतरा रुपये किलो दर मिळाला होता.
वटच्या श्रावणी सोमवारचा मुहूर्त साधत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलाव शुभारंभ आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पहिल्या बोलीचा भाव १००१ रु पये मिळाला असून पिंपळगावच्या मुख्य बाजार आवारात शुभारंभावेळी हाच भाव ८२१ रुपये मिळाला होता.
यावेळी पहिले शेतकरी संजय टर्ले यांचा सत्कार केला. एकूण सहा व्यापारी सदर लिलाव प्रक्रि येत सहभागी झाले होते. तर भर पावसात देखील टमट्याची ८०० जाळी आवक झाली. Tomato auction