प्रत्येक तालुक्यात बसपोर्ट उभारणार ; पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पूर्ण होणार

नाशिकच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात बसपोर्ट उभारणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा , लवकरच पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पूर्ण होणार

नाशिक : नाशिकमधील मेळा बसस्थानकाच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात बसपोर्ट तयार करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पुणे-नाशिक रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले आहे. ते नाशिकमधील मेळा बसस्थानकावर वातानुकूलित बसपोर्ट उभारले जाणार असून या कामाचा भूमीपूजनासाठी आले होते.

यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री  गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे,  खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजनी भानसी, एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एस.टी. महामंडळाचे कार्यकारी अभियंता अ.वा. भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी यामिनी जोशी आदी उपस्थित होते.

आतापर्यत एसटीनेच्यागुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. आता एसटीमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. आगामी काळात सगळ्या बसपोर्टना अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने काम करण्याचा विचार सुरु असल्याचे यापुढील काळात राज्यातील सर्वसामान्यांनाही तितक्याच दर्जेदार सेवा कमी किंमतीत या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. मुबईतील उपनगरी रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्यांचा भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयामुळे राज्यातील आणि विशेषत नाशिकमधील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.

पुणे-नाशिक रेल्वे मार्ग

गेल्या अनेक वर्षापासून नाशिककर पुणे-नाशिक रेल्वे मार्गाची मागणी करत आहेत. याकडे पाहता सदरचा मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल. तसेच नाशिकमध्ये रेल्वेच्या उत्पादनांसाठी कारखाना उभारण्यात येईल, ज्यामुळे इथल्या पूरक उद्योगाला देखील फायदा मिळेल व रोजगार निर्मिती होईल असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार मुंबईमधील 36 उपनगरी स्थानके आधुनिक पध्दतीने विकसीत करण्यात असून तेथे प्रवाश्यांच्या उपयोगी अनेक सुविधा दिल्या जातील. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला थेट विक्रीची सुविधा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकप्रमाणेच राज्यात अशा प्रकारचे  15 ठिकाणी वातानुकूलित बसपोर्ट तयार करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री रावते यांनी दिली. यासाठी महामंडळाने स्वता 60 आर्किटेक्टची नियुक्ती केली. बीओटी तत्वाद्वारे बसस्थानके उभारण्याचा निर्णय सरकारने रद्द केला असून यापुढील काळात अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याची राज्य शासनाने क्षमता निर्माण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.