नाशिक : कांद्याला मिळालेला अती कमी बाजारभाव, या हंगामातील नापिकी व कर्जबाजारीपणा याला शेतकरी सद्यस्थितीत कंटाळलेला आहे. याचाच परिणाम म्हणून नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. Three farmers suicide malegaon nashik
कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या कंधाणे (मालेगाव) येथील ज्ञानेश्वर शिवणकर (वय 35) यांनी कोंब आलेल्या साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोन्यांवर झोपूनच विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवले.
तर नांदगाव येथील चेतन केदा बच्छाव (वय २३) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सायने (मालेगाव) येथील शेतकरी वसंत बंकट सोनवणे (वय ४५) यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे.
यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असली तरी सरकारचा शेतकरी धोरणावरील संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो असे वातावरण निर्माण झाले आहे.