ylliX - Online Advertising Network

IPL क्रिकेटवर तरुणांचा सट्टा; तिघांना अटक – मुख्य सूत्रधार फरार

नाशिक : प्रतिनिधी : के. के. वाघ महाविद्यालया समोरील मुंबई-आग्रा महामार्गावरील सरस्वतीनगरमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकत अटक केली आहे. Three bookies arrested ipl cricket betting nashik crime news

या तरुणांकडून ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तर अहमदनगर जिल्ह्यातील खेडगावचा मुख्य सुत्रधार फरार झाला आहे. आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून फरारीचा तपास करत आहेत.

पोलिसांनी श्रेयश सुधाकर ढोले (२१)केतन कैलास आहेर (२१रा. दोघे लक्ष्मीछाया अपार्टमेंट,सरस्वतीनगर) व तेजस आण्णासाहेब गंगावणे (१९,रा. हरीदर्शन अपार्टमेंट,धात्रक फाटा) या तरुणांना अटक केली आहे. तर मुख्य सूत्रधार अमोल ठुबे (खेडगाव,जि. अहमदनगर) हा फरार झाला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी दि.९ रात्री १० वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी  हे  तिघे टीव्हीवर क्रिकेट सामना पाहत होते. तर सट्टा खेळत होते. हे तिघेजण तीन मोबाईलच्या माध्यमातून एका वहीमध्ये क्रिकेटच्या नोंदी करत असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडील २ हजार २०० रूपयांची रोकडटिव्ही,मोबाईलसेटटॉप बॉक्स असा सुमारे ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आडगांव पोलीस ठाण्यात जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three bookies arrested ipl cricket betting nashik crime news
(फोटो प्रातिनिधिक courtesy : indiatvnews)
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.