ylliX - Online Advertising Network

free IPL fun या मोबाईल ऑपरेटर चे दोन प्लान देणार फ्री मध्ये आयपीएलची मजा

नवी दिल्ली – Reliance Jio ने क्रिकेट चाहत्यांसाठी दोन नवीन प्रीपेड प्लान लाँच केले आहेत. जिओने आपल्या ‘Dhan Dhana Dhan’ ऑफर अंतर्गत हे दोन नवीन प्लान आणले आहेत. याची किंमत ४९९ रुपये आणि ७७७ रुपये आहे. जिओने इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL 2020) च्या अपकमिंग सीजनला ध्यानात ठेवून हे प्लान लाँच केले आहेत. आयपीएलचे आयोजन मार्च किंवा एप्रिल महिन्यात केले जाते. परंतु, यावर्षी कोविड-१९ आउटब्रेक मुळे याच्या आयोजनात उशीर झाला आहे.free IPL fun

डिज्नी+हॉटस्टार VIP सब्सक्रिप्शनसोबत दोन प्लान
जिओच्या या दोन्ही प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन एका वर्षापर्यंत फ्री मिळते. आयपीएल सामन्यांचे प्रसारण तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता. डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शनची वार्षिक प्लानची किंमत ३९९ रुपये आहे.


जिओचे ४९९ रुपयांचे प्लान
हा जिओचा डेटा ओन्ली टॉप अप प्लान आहे. म्हणजेच या प्लानमध्ये युजर्संना व्हाइस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. या प्लान अंतर्गत १.५ जीबी डेटा रोज युजर्संना मिळतो. प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ७४ जीबी डेटा मिळतो.

वाचाः जियो vs एअरटेल vs वोडाफोन: १४९ रुपयांत कोणता प्लान बेस्ट

जिओचा ७७७ रुपयांचा प्लान
जिओच्या या ७७७ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची वैधता मिळते. कंपनी या प्लानमध्ये युजरला एकूण १३१ जीबी डेटा देत आहे. रोज १.५ जीबी हून जास्त आहे. तसेच या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग शिवाय जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेस मिळतो. तसेच सर्व सर्विस सोबत या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपी सब्सक्रिप्शन १ वर्षापर्यंत फ्रीमध्ये मिळते.

जिओने नुकताच ४०१ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. जिओच्या या ४०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. कंपनी या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा ऑफर करीत आहे. तसेच ६ जीबी डेटा सुद्धा मिळतो. म्हणजेच एकूण ९० जीबी डेटा ऑफर केला जातो. रोज मिळणाऱ्या या डेटाची लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये जिओ नेटवर्कवर कॉलिंग साठी अनलिमिटेड मिनिट मिळते. तर जिओवरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट मिळते.free IPL fun

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.