ylliX - Online Advertising Network

ते जतन करत आहेत अंजनेरीच्या कुशीतील दुर्मिळ वनस्पती

​पंचवटी​ (अजय सांगळे)​ : पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास बघून सध्या अनेक ठिकाणी वृक्षांना​ वल्ली बनविण्याचे काम सुरु आहे.  ​मात्र यातही काही वनस्पती ​निसर्गाने माणसाला ​जणू देणगी म्हणून दिल्या आहेत. अशा दुर्मिळ वनस्पती मनुष्य जीवनात विविध आजारांवर उपयुक्त ठरत असतात. यातील अतिशय दुर्मिळ समजली जाणारी वनस्पती म्हणजे ‘कंदीलपुष्प’ या प्रजाती मधील वनस्पती.

या प्रजाती मधील काही वनस्पती जगभरात केवळ नाशिक परिसरात अंजनेरी, सातपूर जवळील फाशीचा डोंगर, रामशेज किल्ला येथे आढळून येत असतात. या वनस्पतींचे ​जतन करणे काळाची गरज आहे.​ ​त्याचदृष्टीने​ साद  एन्व्हायर्नमेंटल कन्झर्वेशन रिसर्च फाउंडेशन नाशिक (इसीआरएफ) च्या सदस्यांनी नाशिक जवळील अंजनेरी, फाशीचा डोंगर व रामशेज किल्ला येथे जाऊन शोध घेतला. कंदील पुष्प या प्रजाती मधील अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या लवाई, हिसुरा व महाबली या वनस्पती आढळून आल्या. त्यांचे जतन व संरक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ एखाद दोन रोपांची संख्या आढळून आली आहे. याशिवाय या ठिकाणी ओर्चीड प्रजाती मधील काही फुले देखील शोध कार्यात निदर्शनास आली.

rare plants anjaneri nashik saad environmental conservation research foundation

अंजनेरी किल्ल्यावर संपूर्ण जगात अतिशय दुर्मिळ समजली जाणारी वनस्पती ‘अंजनेरिका’ केवळ याचठिकाणी आढळून येत असते.

वास्तविकतः या वनस्पतींचा आर्थिक लाभ होत नसेल, परंतु निसर्गाने दिलेला हा अमूल्य ठेवा जतन करणे काळाची गरज आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणून राज्यातील ‘कास पठार’ संरक्षित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे राज्य सरकारने नाशिक परिसरातील अशा दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वनस्पतींचे संरक्षण व जतन करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे असल्याचे प्रमोद धामणे यांनी सांगितले.

rare plants anjaneri nashik saad environmental conservation research foundation

या शोधकार्यात इसीआर(ECRF) फाउंडेशनचे अध्यक्ष​ प्रमोद धामणे, सागर इनामके, सतीश खैरनार, नरेंद्र वाजे, ​अजय सांगळे, उमा विधाते यादव आदी सहभागी झाले होते.
ECRF ही संस्था नाशिक सातपूर येथे काम करत आहे संस्थेचे संस्थापक प्रमोद धामणे , मोबा. 9881949887

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “ते जतन करत आहेत अंजनेरीच्या कुशीतील दुर्मिळ वनस्पती

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.