ylliX - Online Advertising Network

सिडको : व्यायाम करताना तरुणाचा जिम मध्येच मृत्यू

नाशिक : अशक्त वाटत असताना व्यायाम करण्याचा हट्ट तरुणाच्या जीवावर बेतला आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील एका जिम मध्ये अजिंक्य लोळगे हा १७ वर्षीय तरुण जिम मध्ये व्यायाम करत असताना त्याला चक्कर आली. आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

घडलेली घटना अशी की, अजिंक्य नेहमी प्रमाणे सायंकाळी व्यायाम करण्यासाठी उपेंद्र नगर येथील बॉडी झोन या जिम मध्ये आला. रोजपेक्षा त्याला अशक्त वाटत होते. मात्र तरीही त्याने रोजप्रमाणे आपला व्यायाम चालू केला. व्यायामाला सुरुवात करताच अजिंक्यला चक्कर आली आणि तो खाली पडला. यावेळी उपस्थित जिम मधील सहकाऱ्यांनी तातडीने त्याला जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अजिंक्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

अजिंक्य हा नाशिकच्या गुरु गोविंदसिंग पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दुसर्या वर्षात शिकत होता. अजिंक्य त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी आणि आई वडील असा परिवार आहे.

घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.