शिवसेना आक्रमक : मध्यावधीची शक्यता
शिवसेनने आपली सरकारवर नाराजी उघड केली आहे. ज्या सरकारला शेतकरी वर्गाची किंमत नाही ते सरकार काय कामाचे? शेतकारी आत्महत्या करत आहे, गेल्या वर्षात सुमारे साडेचार शेतकरयानी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार शेतकरी वर्गाला कर्ज मुक्ती देत नाही. आज कांदे फेकतोय उद्या भाजपाला फेकू असे म्हणत जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपणार आहे. त्याचेच संकेत संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दिले आहेत. शिवसेनेच्या संपर्क अभियानात ते बोलत होते. त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेनेही मध्यावधी निवडणूकांसाठी सज्ज असल्याचे संकेत आज दिले आहेत. तसे अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जुलैमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच करून मध्यावधी निवडणूकांना शिवसेना सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.
समृद्धी महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा उद्धव ठाकरे यांचा शब्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
शेतकरी आंदोलनात किती पदाधिकारी होते
नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही संजय राऊत यांनीखडे बोल सुनावले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेचे किती पदाधिकारी होते? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. तुम्ही सगळे पद घेवून मिरवता मग कामे का करत नाहीत ? या प्रश्नाचे उत्तरही उद्धव ठाकरेंना द्यायची तयारी ठेवा असेही संजय राऊत सेना पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितले आहे.
————————–
नाशिक मधील घडत असलेल्या घटना, माहिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती,प्रेस नोट,प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना,सत्कार,सभारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम,खेळ,कृषी,व्यक्ति विशेष,संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य,समाज सेवक कार्य,आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टींची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन,शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.
प्रसिद्धी पत्रक,निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.
आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा सु तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.
www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page
E-mail id :- nashikonweb.news@gmail.com
Twitter :- https://twitter.com/nashikonweb (@nashikonweb follow us)
Facebook :- https://www.facebook.com/NashikOnWeb/