सर्व पुरावे असून गुन्हा नोंदवला नाही
मुलीचे भविष्य अंधारात
नाशिक : सर्व नियम पाळत आपल्या घरी निघालेल्या राष्ट्रीय महिला खेळाडूच्या स्वप्नांचा पोलिसाच्या वाहनाच्या धडकेने तिचे आयुष्य पूर्ण अंधारमय झाले आहे, यामध्ये धडकेत तिच्या कण्याला मोठी दुखपत झाली असून केस करू नका असे म्हणून मदत करतो म्हणत असला पोलिस तर फरार आहेच ज्या स्टेशन अंतर्गत ही घटना घडली ते सुद्धा तक्रार दाखल करवून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात जेलरोडच्या कोयनानगर सोसायटीत रहिवासी असलेल्या हर्षदा शिवकुमार माळवे (वय २६) या आपल्या आई सुरेखा सोबत १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुचाकीवर जेलरोडहून टाकळीमार्गे प्रवास करत होती . टाकळीतील नव्या पुलावर समोरून ओव्हरटेक करून आलेल्या पोलिसाच्या मारुती कारने (एमएच १५/एएस ९३८८) दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात हर्षदा हेल्मेट होते तरी जखमी झाली आणि त्यातही तिच्या कण्याला मार लागला आहे.

पोलिसाने दोघींना लोकमान्य रुग्णालयात दाखल तर केले आणि महेश माळवे, अनिता माळवे यांना रुग्णालयात त्याने आपले आडनाव पाचारणे सांगून आडगाव पोलिस ठाण्यात सांगून केस करू नका मदत करतो असे आश्वासन दिले होते. फोन देवून तो गेला मात्र दुसऱ्या दिवशी हात वर करत त्याने काही हजार रुपये देतो असे सांगितले आणि टाळण्यास सुरुवात केली आहे. आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्याआधीच पोलिसांनी एमएलसीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करत सहकाऱ्याला पाठीशी घातले आहे. सर्व पुरावे असतांना पोलीस असे का वागत आहेत असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
हर्षदाचे बारावीपर्यंतचे शिक्षण के. जे. मेहतामध्ये झाले. हर्षदा सॉफ्टबाल खेळाडू असून, तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे. तीची घरातील परिस्थिती हालाकीची असून फक्त तीच कमावती आहे. त्यामुळे घरावर मोठे संकट कोसळले आहे.
हर्दाच्या कंबरेची दोन्ही हाडे, मांडीचे हाड मोडले, दोन्ही मनगटांचा तुटली असून डाव्या पायावर खोलवर जखम, मांडी , लघवीच्या ठिकाणी गंभीर इतकी भयानक तिची स्थिती असून तोंडाला जबर मार आणि टाके पडले आहेत. डॉक्टरांनी हर्षदावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागतील व पाच लाख खर्च येणार असून आता त्यांनी मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस यांनी लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.